संस्कार पोदार लर्न स्कूल हे क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, खेळाडूंमध्ये खेळाडूवृत्ती निर्माण करुन ग्रामीण भागातील खेळाडूंना राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करण्याची संधी निर्माण करणारे केंद्र आहे:
-मा.अजय क्षीरसागर संचालक संस्कार पोदार लर्न स्कूल.उमरखेड
तालुका प्रतिनिधि
एस पी दळवी / उमरखेड
उमरखेड: दि.२५ व २६ ऑक्टोबर रोजी अकोला येथे झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धा २०२४-२५ अंतर्गत विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत पहिल्याच वर्षी पदार्पण करून संस्कार पोदार लर्न स्कूल, उमरखेड येथील विद्यार्थ्यांनी आपल्या गटात ऐतिहासिक विजय प्राप्त केला.
स्पर्धेत प्रत्येक चुरशीच्या सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत १४ वर्षे वयोगटातील प्रथमेश राठोड याने अटी तटी च्या सामन्यांत द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच रुद्र शिलार, प्रियांशु मोरे, प्रणव पवार, ऋषीराज शिंगणकर या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्याचबरोबर १७ वर्ष वयोगटात जानवी काचगुंडे या विद्यार्थीनीने जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तृतीय स्थान पटकावले. सामन्यानंतर जिल्हाक्रीडाधिकारी अकोला सतीश भट यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले. क्रीडा शिक्षक व बॉक्सिंग कोच राहुल राठोड यांनी विद्यार्थांच्या व्यस्त दैनंदिन दिनचर्येतील वेळेतून विद्यार्थ्यांसाठी वेळेवर उभे राहून खूप कमी वेळात सराव घेऊन हे विद्यार्थी त्यांनी घडवले, क्रीडा शिक्षक भावेश पटेल व सचिन शिंदे यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन लाभले. असे मत विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे संचालक राजेश देशमुख, अजय क्षीरसागर, निशांत बयास, धिरज बगाडे, शाळेचे प्राचार्य डॉ. भैरोबा मुंजाळ, प्रशासकीय अधिकारी अतिश दिघेवार, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांच्या वतीने कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.