अवधूत खडककर
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
उमरखेड : परभणी येथे संविधान प्रतिकृतीच्या विटंबनीच्या घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ उमरखेड येथे शेकडो आंबेडकरी अनुयायांकडून उमरखेड येथील माहेश्वरी चौकात तब्बल दोन तास रस्ता रोको आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.
परभणी येथे १० डिसेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची समाज कंटकाने विटंबना केली होती. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात घटनेच्या निषेधार्थ आंदोलने करण्यात आली त्याच घटनेचे पडसाद १३ डिसेंबर रोजी डिसेंबर रोजी उमरखेड येथे उमटले. उमरखेड तालुक्यातील विविध आंबेडकरी पक्ष संघटनांकडून निषेध मोर्चा काढीत माहेश्वरी चौकात तब्बल दोन तास ठिय्या मांडून रस्ता रोको केला. यावेळी सुनिल पाटील चिंचोलकर, सरोजा देशमुख, पत्रकार सिद्धार्थ दिवेकर, मिलिंद धुळे, वीरेंद्र खंदारे, जॉन्टी विनकरे इत्यादींनी परभणी येथील घटनेचा आपल्या मनोगता मधून निषेध व्यक्त केला. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या त्यामुळे तब्बल दोन तास वाहतूक खोळंबली होती. दरम्यान आक्रमक आंदोलकांनी माहेश्वरी चौकात संविधानाचा विजय असो, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो…! अशी जोरदार घोषणाबाजी करीत चौक दणाणून सोडले, त्या नंतर माहेश्वरी चौकातून उपविभागीय अधिकारी कार्यालया पर्यंत निषेध मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना महिलांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदनात परभणी येथील सुरू असलेले कोंबिंग ऑपरेशन थांबवण्यात यावे, निर्दोष भीम अनुयायांची तात्काळ सुटका करण्यात यावी, आंदोलकावर कुठल्या प्रकारचे गुन्हे दाखल करू नये, कुटुंबाला करणाऱ्या इसमावर देशद्रोहाचा कोणाला दाखल करावा अशा मागण्या नमूद करण्यात आल्या होत्या.
रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर, शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, ता. अध्यक्ष गौतम नवसागरे,भीम टायगर सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष श्याम धुळे, भीम टायगर सेनेचे शहराध्यक्ष सिध्दार्थ दिवेकर, जिल्हा उपाध्यक्ष करन भरणे, आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष जॉन्टी विनकरे, शहराध्यक्ष प्रफुल दिवेकर, ता. अध्यक्ष देवानंद पाईकराव, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संबोधी गायकवाड, जिजाऊ ब्रिगेडच्या सरोज देशमुख, भारत मुक्ती मोर्चाचे विद्वान केवटे, काँग्रेसचे वीरेंद्र खंदारे, प्रहारचे राहुल मोहितवार, कैलास कदम,संदीप विनकरे, शाहरुख पठाण, मिलिंद धुळे,लक्ष्मण धुळे, अतुल धुळे, आत्माराम हापसे, डी.के. दामोदर, अत्तादीप धुळे, उषाताई इंगोले अध्यक्षा रमामाता महिला मंडळ, कांचनताई दिवेकर, स्वातीताई दिवेकर, उज्वला धबाले, बेबाबाई गवंडे, पंचफुला पाईकराव, मंगलाबाई धुळे, कविता धुळे,मिराबाई दिवेकर, भारतीबाई दिवेकर, मधुबाला दिवेकर, लता श्रवले, रंजना आठवले यांच्यासह उमरखेड तालुक्यातील शेकडो संविधान प्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.
चौकट :- आजच्या निषेध रॅली तथा रास्ता रोको संदर्भात उमरखेडचे ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या लाभलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करतो – सुनिल पाटील चिंचोलकर, जिल्हाध्यक्ष यवतमाळ रिपब्लिकन सेना