तालुका प्रतिनिधी
शुभम गजभिये /चिमुर
:-महाविकास आघाडीची सरकार येवुन दे माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये अडीच हजार रुपये टाकू असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेता विजय भाऊ व वडेट्टीवार यांनी केले
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. सतीश भाऊ वारजुकर यांचे नामांकन भरण्याच्या शक्ती प्रदर्शन महारॅलिच्या सभेला उपस्थित प्रचंड जनसमुदायास मार्गदर्शन करताना बोलत होते
सभेला खासदार डाॅ.नामदेव किरसान, उमेदवार डॉ सतिश भाऊ वारजुकर,माजी मंत्री अविनाश वारजुकर,प्रा राम राऊत सर, गजानन बुटके,दिगांबर गुरपुडे, अनिरुद्ध वनकर, विवेक कापसे,रोशन ढोक , स्प्रप्नील मालके, लोकेश रामटेके,प्रफुल खापर्डे,चुन्नुरवार,विनोद बोरकर,रमाकांत लोधे,संजय डोंगरे, भोजराज मरसकोल्हे,चिमुर तालुका कांग्रेस कमेठी अध्यक्ष विजय पाटील गावंडे,प्रमोद चौधरी,उबाठाचे प्रशांत कोल्हे, अविनाश अगडे,प्रा मोहन जगनाडे सर ,सौ.भावनाताई बावणकर, माधुरी ताई रेवतकर,प्रज्ञाताई गड्डमवार,किशोर शिंगरे,साईस वारजुकर आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
याप्रसंगी अतिथींनी उपस्थीतांना मार्गदर्शन केले
जाहीर सभेला संबोधित करताना विरोधी पक्ष नेते विजय भाऊ वडेट्टीवार पुढे म्हणाले की या खोकेबाज सरकारच्या महाराष्ट्रात दररोज सात शेतकरी आत्महत्या करतात बेरोजगार युवक कामाच्या शोधात भटकताना दिसते आहे
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही सोयाबीनचे भाव पाळले आहेत
हा दोन हजार कोटी चे कामे सांगतो झालीत का या चिमुर क्षेत्रात कुठे गेले दोन हजार कोटी
भांडियाच्या घरात गेले
महाराष्ट्रात या पन्नास खोके एकदम ओके सरकारनी काही निवडक लोकांना तिस पस्तीस टक्याच्या कमिशन खोरीने कामे वाटली आता अशा सरकारला सत्तेत येवुन देवु नका
मोखाबर्डी उपसा सिंचन अंतर्गत दहा वर्षांच्या सत्ता कार्यकाळात चीमुरच्या शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाणी देवु शकले नाही अशांना आता धळा शिकवला पाहिजे
महागाई बेरोजगारी विजेच्या बिलात भरमसाठ वाढ केली तेलाचे भाव वाढविले
पुढे भाषनात बोलतांना वडेट्टीवार म्हणाले यावेळेस सतिश भाऊ किती ही कोणीही जेवढा दम लावायचा लावु दे याच्या मध्ये कितीही दम असु दे यावेळेस सतिश वारजुकर आमदार होणार असे आपले लाडके लोकप्रिय उमेदवार सतिश भाऊ वारजुकर आहेत यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले
सभेचे संचालन गजानन भाऊ बुटके यांनी केले प्रास्ताविक भाषण विजय पाटील गावंडे यांनी केले तर आभार उमेदवार डॉ सतीश वारजुकर यांनी मानले सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता