अवधूत खडककर
यवतमाळ/प्रतिनिधी
जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती रॅलीस उपजिल्हा रुग्णालय उमरखेडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कपाळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली.
एचआयव्ही व एड्सबाबत समाजामध्ये अजूनही समज- गैरसमज आहेत आजही एचआयव्हीबाधितांना वाळीत टाकले जात असल्याचे चित्र बघावयास मिळते परंतु अशा रुग्णांना मदत करणे आपली प्रमुख जबाबदारी असल्याचे प्रतिपादन डॉक्टर कपाळे यांनी केले.
जागतिक एड्स दिनानिमित्त गुरुवारी सकाळी उमरखेड शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत विद्यालयीन विद्यार्थी
शिक्षक व नर्सिंग कॉलेज पुसद, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट पुसद, जीवन ज्योती संस्था पुसद,विहान संस्था पुसद,सहभागी झाले होते.
तसेच ईनर व्हील क्लब इत्यादी मान्यवरांचा सहभाग होता.
ICTC समुपदेशक वैशाली धोंगडे ह्यांनी अथक परिश्रम घेऊन सदर रॅलीचे आयोजन आणि सूत्रबद्ध संचलन केले. उपजिल्हा रुग्णालय उमरखेड पासून ते शहरातल्या मुख्य चौका पर्यंत पायी चालत जनजागृती करत परत उपजिल्हा रुग्णालय उमरखेड या ठिकाणी येऊन समारोप करण्यात आला.
ह्या रॅलीत रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी , सिस्टर्स , ब्रदर्स व ईतर कर्मचारी सुद्धा सहभागी झाले होते.तसेच माधव कल्याणकर ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यांनी काढलेली एड्स रोगाचे जनजागृती करणारा देखावा आपल्या रांगोळी द्वारे साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले त्याबद्दल उपस्थितांनी त्यांची विशेष आभार व्यक्त केले.