अवधूत खडककर
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
उमरखेड : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे पालक आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी ऊस तोडणीसाठी, विटा करण्यासाठी, कापूस वेचणीसाठी व ईतर कामासाठी राज्यात व बाहेरील राज्यात जात असतात परंतु त्यांच्या पाठीमागे असलेल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न अनुत्तरित राहतो म्हणून महाराष्ट्र शासनाने ऊस कामगारांच्या मुलांसाठी “हंगामी अनिवासी वसतिगृहाची” योजना सुरू करण्यात आली त्यामुळे ग्रामीण भागातील वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटल्यामुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उमरखेड तालुक्यातील एकमेव नागापूर येथील जि.प.उच्च प्राथ.शाळेत आज हंगामी अनिवासी वसतिगृहाचे उद्घघाटन पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पकंज दाभाडे यांनी केले तर प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे येथील यशदा प्रबोधिनींचे राजु वानखेडे, पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी मिलिंद कांबळे, विवेकानंद विद्यालय पळशीचे पर्यवेक्षक अरुण काळे सर उपस्थित होते. प्रमुख उपस्थितांनी संत गाडगेबाबा मोक्षधामाची पहाणी केली नंतर शाळेतील विविध उपक्रमांची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.हंगामी वसतीगृहात १०४ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.सकाळी भाजी , पोळी व संध्याकाळी वरण, भात,भाजी, पोळीची व्यवस्था आहे.उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रकाश शिंदे सर यांनी शाळेच्या प्रगतीबाबत माहीती प्रस्ताविकेतुन दिले तर गावांच्या सर्वांगीण विकासाचे श्रेय चितांगराव कदम यांनी सर्व गावकऱ्यांना दिले व गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे,मेहनतिमुळे व आत्मविश्वासामुळे अनेक पुरस्कार मिळाले व त्यातून मिळालेल्या रकमेतून गावचा सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून विकास करण्यात आला.पकंज दाभाडे साहेबानी शाळेतील मुलींना “गुड टच-बॅड टच”बद्दल माहिती देऊन स्वयं निर्भर व्हावे असा सल्ला दिला.राजू वानखेडेनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षपद व्यवस्थापन समितीचेअध्यक्ष संदीप जाधव होते तर प्रास्ताविक बालाजी कदम सर यांनी केले.यानंतर यशदा प्रबोधिनींचे राजु वानखेडे यांच्या मार्गदर्शनात टेकडीवरील राजीव गांधी भवनची पाहणी केली. राजीव गांधी भवन मधील दोनशे खुर्च्यांची आसन व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, टच स्क्रीन बोर्ड, थंड पाणी पिण्याची व्यवस्था, आरो प्लांट, अग्निशामक बंब, प्रशिक्षणार्थ्यांसाठी स्वतंत्र बाथरूम, शौचालयाची व्यवस्था, राजीव गांधी भवन समोरील मोकळ्या जागेवर पेव्हर ब्लॉकची व्यवस्था, सोलर एनर्जी, सोलर हीटर व सोलर पंप, प्रशिक्षणार्थ्याच्या जेवणाच्या भांड्याची व्यवस्था बघून समाधान व्यक्त केले व भविष्यात राजीव गांधी भवन मध्ये अनेक पंचायत राज प्रशिक्षणाची निवासी व्यवस्था केली जाईल असे सुद्धा यशदाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हंगामी अनिवासी वस्तीगृहातील केलेल्या जेवणाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला सरपंच गोदाजी जाधव, सविता कदम माजी सभापती, छाया चाकोरे मॅडम, पद्मावती लोमटे मॅडम,संदीप कवडे सर, सतिश घोडके सर, बंडा कदम, परशुराम जाधव, लचिराम राठोड,भुरा कदम, डॉ.अंबादास कदम, प्रताप आडे रोजगार सेवक, मारुती ठेंगे ग्रामपंचायत सेवक, ज्योती कदम ग्रामपंचायत ऑपरेटर, सुनंदा जाधव , स्वर्णा कदम, वच्छला राठोड , कांता राठोड,पंडीतराव कदम, बापूराव कुर्मे उपाध्यक्ष तंटामुक्त, गुलाब महाराज आडे अध्यक्ष तंटामुक्त समिती,चंदु जाधव, वैजयंता जाधव,सिंधु कुरमे, ज्योती कपाळे व गावकरी उपस्थित होते.