शहर प्रतिनीधी
प्रशांत आरेवाड / ढाणकी
शहरात नव्यानेच स्थापन झालेल्या दुर्गा वाहिनी या संघटनेच्या वतीने, पोलीस बांधवांना व पत्रकार बांधवांना राखी बांधून हा उत्सव साजरा करण्यात आला. सविस्तर वृत्त असे की, दुर्गा वाहिनी या महिलांच्या संघटनेचे मागील वर्षापासून शहरात कार्य सुरु आहे. विश्व हिंदू परिषद द्वारा महिलांच्या सशक्तीकरणासाठी सेवा सुरक्षा व संस्कार या मूल्यांच्या आधारावर, महिलांना राष्ट्र प्रवाहात आणण्याचे कार्य दुर्गावाहिनी या संघटने द्वारा होत असते. तसेच समाजाचे संरक्षण करणाऱ्या प्रत्येक नागरिक पोलीस व पत्रकार यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, व त्यांचे मनोबल वाढावे या हेतूने रक्षाबंधन या उत्सवाचे आयोजन केले होते. रक्षाबंधन उत्सवाच्या निमित्ताने ढाणकी शहरातील पोलीस बांधव व पत्रकार बांधव यांना एकत्रित राखी बांधण्याचा कार्यक्रम ढाणकी शहरातील पोलीस चौकी येथे पार पडला. याप्रसंगी अनेक दुर्गांनी ओवाळणी म्हणून पोलिसांनी ढाणकी व ढाणकी परिसरातील महिलांचे रक्षण करण्याचे आश्वासन द्यावं. हीच आमच्या सर्व दुर्गांची ओवाळणी असेल असे उद्गार, शिवानीताई कोडगीरवार यांनी काढले.या प्रसंगी ठाणेदार यांनी दुर्गावाहिणाच्या कार्याची स्तुती करत त्यांना अपेक्षित असलेली सामाजिक कामे,महिलांच्या बाबतीत असलेल्या समस्या तात्काळ निकाली काढणार असून, गावातील टुकार मुलं व चिडिमारीला लगाम लावू असे आश्वासन या कार्यक्रमात दिले. या कार्यक्रमात ठाणेदार प्रेम केदार, शिवाजीराव टिपूर्णे, मुंढे, खरात,गिते, प्रवीण जाधव, अन्य पोलीस बांधव, दर्पण पत्रकार संघांचे अध्यक्ष सुनील मांजरे, पत्रकार सेवा संघांचे अध्यक्ष, , अशोक गायकवाड, अनिल राठोड विनोद गायकवाड, दिगंबर बल्लेवार, मोईनोद्दीन, असे पत्रकार बांधव उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे आयोजक, प्रखंड प्रमुख प्रतीक्षा उपेवाड, संयोजिका शुभांगी मिटकरे, अक्षरा गिरबनवाड, स्पृहा इंगोले, उन्नती आडे, जयश्री आडे, शिवानीताई कोडगीरवार, माधुरीताई येरावार, सुजाताताई येरावार,सरस्वतीताई चिन्नावार यांनी परिश्रम घेतले.