इनरव्हील क्लब च्या वतीने एस डीओना निवेदन.
अवधूत खडककर
उमरखेड
उमरखेड : गेल्या काही दिवसापासून देशाचे लक्ष पश्चिम बंगालमधील कोलकत्ताकडे आहे 9 ऑगस्ट रोजी कोलकत्ता येथील मेडिकल कॉलेजमधील एका महिला डॉक्टर वर बलात्कार करून तिची कुरपणे हत्या करण्यात आली या घटनेचा संपूर्ण देशभर संताप व्यक्त करण्यात आला त्या पाठोपाठच बदलापूर • येथे पाच वर्षाच्या मुलीवर – नराधमांनी क्रूर कृत्य केले या प्रकरणात देखील संपूर्ण महाराष्ट्रभर संतापाची लाट निर्माण झाली. सदर दोन्ही घटना अत्यंतलज्जास्पद असून माणुसकीला काळीमा फासणार्या आहेत. सदरचे गुन्हे हे कुण्या एका व्यक्तीचे नसून यामध्ये एकापेक्षा जास्त राक्षसी वृत्तीची लोक असावेत ज्यांनी हे महाभयंकर गुन्हे केले आहेत. राज्यात आणि देशात महिला असुरक्षित आहेत, सर्व महिलांना सुरक्षेच्या दृष्टीने न्याय मिळाला पाहिजे, त्यामुळे गुन्हेगारावर तात्काळ कारवाई करून कठोर शिक्षा करण्यात यावी अशी आमची मागणी असून त्या अनुषंगाने हे निवेदनदिल्याचे इनरव्हील क्लब उमरखेडच्या अध्यक्षासौ आशाताई देवसरकर यांनी सांगितले यावेळी क्लबच्या चार्टर प्रेसिडेंट डॉ विमलताई राऊत, माजी अध्यक्षा वंदना वानखेडे, प्रा जयमाला लाडे, सदस्य सिमा टेकाळे, सुनिता नरवाडे, ममता कस्तुरे, डॉ शितल धोंगडे, वैशाली धोंगडे, माधूरी देशमूख, सविता पाचकोरे व सचिव डॉ वसुंधरा शिंदे उपस्थित होत्या.