अवधूत खडककर
ता.प्रति.उमरखेड
उमरखेड:शेतकरी आत्महत्या साठी यवतमाळ जिल्हा अग्रेसर तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या कापूस उत्पादक शेतऱ्यांभवती असल्याचे निदर्शनास आल्याने आणि सध्या सोयाबिन पिकाची उत्पादकता दिवसे दिवस कमी होत चालल्यामुळे शेतकरी संकटात येत असून पुन्हा कापूस या पिकाकडे वळताना दिसत आहे. परंतु कापसावरील कीड आणि रोगांमुळे वाढलेलेला खर्च आणि निसर्गाची अनियमितता यामुळे कपाशीला आणि सोयाबीनला पर्याय पीक शेतकऱ्यांना देण्याची गरज निर्माण झाली आहे. शेतीचे तुकडे होऊन जमीन धारण दिवसेंदिवस कमी होऊन अल्प भूधारकांचे प्रमाण वाढत आहे, यामुळे कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पन्न घेणे हे एकमेव धोरण स्विकारणे गरजेचे झाले आहे. कपाशीवर प्रक्रिया करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक व स्व. जेठमलजी महेश्वरी आणि स्व. भाऊसाहेब माने व त्यांचे सर्व सहकारी यांच्या प्रयत्नाने उमरखेड येथे सन १९६४ वर्षी जिनिग अँड प्रसिंग सहकारी संस्था स्थापन करण्यात आली होती. या सहकारी संस्थे मध्ये संस्थेच्या मुख्य उद्दिष्टं मध्ये कापूस प्रक्रिया सोबतच नव्याने रेशीम प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासंबंधी चे उद्दिष्ट सहकार विभागाच्या परवानगीने उपविधी मध्ये दुरुस्ती करून समाविष्ट करण्यात आले आहे. कापूस आणि रेशीम हे दोन्हीही उद्योग वस्त्र उद्योगामध्ये मोडत असल्यामुळे शासनाने या दोन्हीही विभागाला वस्त्र उद्योगामध्ये एकत्र समाविष्ट केले आहे.
आपल्या जिल्ह्याची आत्माहत्येची आत्मघाती ओळख पुसण्यासाठी संयुक्तपणे सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे जमिनीचे तुकडे होऊन बरेच शेतकरी अल्प भूधारक झाले आहेत.ग्लोबल वॉर्मिग मुळे व सिंचनासाठी पाणी अपुरे पडत आहे, कमी पाण्याचा सिंचनासाठी वापर आणि कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन घेणे काळाची गरज आहे. कष्टकरी शेतकऱ्याची एक एकर रेशीम शेती ही १० एकर कपाशीची आणि १० एकर उसाची बरोबरी करू शकते, हे लक्षात घेऊन आपल्या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी साठी या अगोदर शेतकऱ्यांनी हाती घेतलेल्या दूध उत्पादना सोबत रेशीम उत्पादनाला जोडून “सिल्क आणि मिल्क” याची सांगड घालण्याचा प्रयत्न करणे गरजेचे होते कारण रेशीम मध्ये रेशीम अळ्यांना खाऊ घातलेला तुती पानांचा उरलेला वेस्ट आणि अळ्यांची विष्टा हे गाई म्हशी चे खाद्य होऊ शकते, तसेच तुतीचा हिरवा पाला ही दुधाळ जनावरांना पोस्टिक आहे. यामुळे रेशीम कोष उत्पादन ते रेशीम धागा निर्मिती आणि कापड विणकर उद्योग अशी साखळी निर्माण करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत, अशा प्रकारे रोज उत्पन्न दुधातून आणि महिन्याला पगारी प्रमाणे रेशीम कोष उत्पन्नातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ झाल्यास आपल्या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक विकास होण्यास मदत होईल. या अनुषंगाने सहकार महर्षी भाऊसाहेब माने शेतकरी सहकारी जीनिंग अँड प्रेसीग संस्थेने रेशीम प्रक्रिया मसुदा आणि धोरण ठरविण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे रेशीम विभागाचे उपसंचालक महेन्द्र ढवळे, उमरखेडचे भूमीपुत्र व महाराष्ट्र राज्य रेशीम संचालनालय चे माजी संचालक डॉ. लक्ष्मीकांत कलंत्री, प्रादेशिक रेशीम कार्यालय अमरावती चे सहाय्यक संचालक हेंमत लाडगांवकर, यवतमाळ जिल्हा रेशीम विकास अधिकारी विलास शिंदे , उमरखेड आणि महागाव तालुक्याचे रेशीम विभागाचे तांत्रिक अधिकारी कुंदण चव्हाण आणि स्वप्नील कावळे यांच्या समवेत दिनांक २८ ऑगष्ट रोजी या भागाचे लोकं प्रतिनिधी आमदार, संस्थेचे पदाधिकारी, सर्व संचालक आणि या भागातील मान्यवर तचेच प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांना एकत्र करून रेशीम समिती सभे मध्ये रेशीम परिषद घेऊन रेशीम कोषावर प्रक्रिया करून रेशीम सुतगिरणी उभारण्यासाठी पायाभूत सुविधा, लागणारे मनुष्यबळ, आर्थिक भाग भांडवल या साठी सखोल मार्गदर्शन होऊन चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. विजय माने, मुख्यप्रवर्तक सत्यशोधक शेतकरी संघ उमरखेड यांनी दिली आहे. संस्थेची वाटचाल शेतकऱ्यांना समृध्द करणाऱ्या वाटेने पाऊले चालती रेशीम उद्योगाची वाट, शेतकरी हित हेच अपुले विठ्ठल दर्शन, शेती हीच आपली पंढरी असा संदेश या द्वारे देण्यात आला आहे.
चौकट :
“शेतकरी हाच आपला विठ्ठल, शेतकऱ्याचे हित हेच आपुले विठ्ठल दर्शन या साठीच करूया अठ्ठास, आपली शेती हीच आपली पांढरी संमजून पाऊले चालती रेशीम उद्योगाची वाट”
डॉ. विजय माने
चौकट:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासंदर्भात चार दुकाने गाळेधारकांनी त्यांना जीन प्रेस च्या नवीन व्यापार संकुलनात देण्यात येणारे गाळे संबंधी आमच्या आश्वासनाचा सन्मान करून न्यायालयातील याचिका मागे घेतल्यामुळे महाराजांच्या स्मारकाचे काम सुरू झाले आहे या करिता त्या चारही गाळे धारकाचे व ज्यांनी कोणी या साठी परिश्रम घेतले त्या सर्वांचे सत्यशोधक संघातर्फे व सर्व जनते तर्फे जाहीर आभार व्यक्त करतो.
नितीन माहेश्वरी