आंदोलनाची दाखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ अपंग प्रमाणपत्र सादर कारण्याचे दिले आदेश
बुलढाणा :- केंद्र व राज्य शासनाने नोकरी भरती प्रक्रिये मध्ये जुन्या शासन निर्णयाप्रमाणे अपंगांना ३% राखीव जागा ठेवून त्या जागेवर अपंगांचीच नियुक्ती करण्याचे सक्तीचे आदेश होते. याचा फायदा बोगस अपंग IAS पुजा खेडकर सारख्या बोगस अपंगांनी अधिकारी होण्यासाठी अपंग अनुशेष मधुन नियुक्त्या मिळविण्यासाठी शारिरीक अपंगत्व नसतांनी सुध्दा डॉक्टरांसोबत संगनमत करून अपंगत्वाचे प्रमाणपत्र बनवून घेतले व राखीव जागेवर नियुक्त्या मिळविल्या. सध्या स्थितीत IAS अधिकारी पुजा खेडकर प्रकरण चर्चेत असतांनी अनेक विभागामार्फत अपंगत्व तपासणी मोहीमेस सुरुवात करण्यात आलेली आहे. त्याच प्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर व चिखली पंचायत समिती अंतर्गत खंडाला मकरध्वज येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथ शाळा परिषद उर्दू उच्च प्राथ शाळा देऊळगाव शाकर्सा येथे कार्यरत असलेले बोगस अपंग शिक्षक व शिक्षिका वैशाली पढधान, त्रिवेणी शेळके, सुम्हनता सावळे व एजाज अहमद शेख हुसेन या चारही बोगस अपंग शिक्षकांच्या अपंगत्वाची व्यक्तीशा वैद्यकिय फेरपडताळणी करण्याचे सख्तीने आदेशित करावे. अन्यथा अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे राज्य सचिव मा. श्री. शेख कलीम यांच्या नेतृत्वात दि.२७/०८/२०२४ रोजी आपल्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.आंदोलनाची दाखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ अपंग प्रमाणपत्र सादर कारण्याचे दिले. या आंदोलनात शेख कलीम, राजिक शाह, मयूर मेश्राम विशाल इवरकर राहुल वानखडे अझर कुरेशी, करमत शाह व अनेक कार्यकार्यें प्रामुख्याने उपस्थित होते.