कृष्णा चौतमाल
हदगांव प्रतिनिधी
पक्ष जो आदेश देतील ती जबाबदारी स्वीकारण्यास मी तयार – डॉक्टर देवसरकर
हदगांव : अशोकराव चव्हाण यांचे म्हणून खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले व नांदेडच्या वैद्यकीय क्षेत्रात ख्याती असेल डॉक्टर अंकुश देवसरकर यांनी शेकडो समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला, आज त्यांचा नांदेड येथे आगमन झाल्यानंतर त्यांचा जंगी स्वागत करण्यात आलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाला प्रभावित होऊन मी शिवसेनेत प्रवेश केला आहे पक्षाची जबाबदारी दिली ते काम मी पार पाडेल असं ही डॉ अंकुश देवसरकर म्हणाले. हदगाव – हिमायतनगर मतदारसंघातून तयारी करताना पाहायला मिळत आहेत. विधानसभा निवडणुकीत ते शिंदे गटाकडून हदगाव हिमायतनगर मतदारसंघात दावा करण्याची शक्यता आहे.