भगवान गौतम बुध्दाच्या मूर्ती ला उपासकानी केले वंदन
तालुका प्रतिनिधी
शुभम गजभिये -चिमूर
रॅली द्वारे सुगत कुटी कडे रवाना..
--३१ ऑगस्ट.--
भगवान गौतम बुद्ध ची ८ फूट उंची ची मूर्ती ची प्रतिष्ठापणा सुगत कुटी मालेवाडा येथे होणार असताना दरम्यान गुजगव्हान विपश्यना केंद्रात मूर्ती ला वंदन करण्यात आले.
आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या सहकार्यातुन गगन फाउंडेशन व भांगडिया फाउंडेशन च्या माध्यमातुन भगवान गौतम बुद्धाच्या दोन मुर्त्या प्रतिष्ठापणा साठी आणण्यात आल्या.
यावेळी बौद्ध उपासक मोठया संख्येने उपस्थित होते.जयंत गौरकर, शैलद्र पाटील, पराग अंबादे, लीलाधर बनसोड, प्रफुल डांगे, उत्कर्ष मोटघरे, संजय घुटके सह शेकडो महिला पुरुष बौद्ध उपासक उपस्थित होते.
तसेच पत्रकार वर्ग सुद्धा उपस्थित होते.
तसेच भाजप तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, किसान नेते एकनाथ थुटे, जेष्ठ नेते अर्जुन पाटील थुटे, रोशन बनसोड, रमेश कंचर्लावार, सुधीर पोहनकर,मनी रॉय आदी उपस्थित होते.