तालुका प्रतिनिधी
शुभम गजभिये -चिमूर
चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे दि.१९ सप्टेंबर ला सामाजिक कार्यकर्ते योगेश कवडुजी मेश्राम यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना अभिवादन करून विद्यार्थ्यांना पेन व नोटबुक चे वितरण केले. वाढदिवस प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस व आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. वाढदिवस प्रत्येक जण आप – आपल्या पद्धतीने साजरा करत असतात. वाढदिवसाच्या निमित्ताने योगेश मेश्राम यांनी आपल्या क्षमतेनुसार शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक, पेनाचे दान करत समाजाप्रती एक आदर्श उभा केला आहे. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना ते म्हणाले की, वाढदिवसाला अनाठायी खर्च करण्यापेक्षा समाजाप्रती प्रेम भावना निर्माण करण्याचा सामाजिक दायित्व जोपासत व आपल्या क्षमतेनुसार दान करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. यावेळी आयु. जगदीश रामटेके, आशिक रामटेके,अशोक मेश्राम, वामन गजभिये,प्रदीप मेश्राम,धनराज शेंडे,रोशन बोरकर,सूरज गजभिये,निखिल शेंडे,प्रवीण दुमाने, शांताबाई रामटेके, शकुंतला मेश्राम,प्रेमिला गजभिये,आदी मान्यवरांनी त्याचे अभिनंदन केले. उपस्थित उपासक, उपासिका ,युवक व शालेय विद्यार्थी सर्वांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.