जय श्रीराम बाल गणेश उत्सव समितीचा उपक्रम
तालुका प्रतिनिधी
शुभम गजभिये -चिमूर
चिमूर शहरातील चिमूरचां राजा जय श्रीराम बाल गणेश उत्सव समिती टिळक वॉर्डच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. जय श्रीराम बाल गणेश उत्सव समिती टिळक वॉर्ड चिमूरच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी मस्करया गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. उत्सव समितीच्या वतीने दरवर्षी सामाजिक उपक्रम राबविल्या जातात. नवसाला पावणारा गणपती बाप्पा अशी ओळख या गणेश मूर्तीची आहे. यावर्षी सुधा आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात शंभर पेक्षा जास्त रुग्णांनी तपासणी करून घेतली. सोबत मोफत औषधी वाटप करण्यात आली. रक्तदान शिबिरात 50 पेक्षा अधिक युवकांनी रक्तदान दान केले. रक्तदात्याना व्हॉईस ऑफ मीडिया चिमूर तालुका अध्यक्ष रामदास हेमके यांचे उपस्थित
प्रमाण पत्र व छत्री वाटप करण्यात आली. या सामाजिक कार्याची सर्वत्र प्रशंसा होत असून चिमूरचां राजा जय श्रीराम बाल गणेश मंडळ टिळक वॉर्ड चिमूरचे सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.