सासवड : ६८ व्या धम्मंचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान सासवड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुरंदर हवेली चे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी भारतीय बौद्ध महा सभेच्या वतीने त्रिशरण ,पंचशील ,भीमस्तुती, धम्मपालन गाथा घेण्यात आली. यावेळी पुरंदर हवेलीचे आमदार संजय जी जगताप यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला शांतीचा संदेश देणारा भगवान गौतम बुद्धांचा महान धम्म या देशाला देऊन भारतासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. यावेळी बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या धिवार, बहुजन सचिव कैलास धिवार, सासवड नगरीचे माजी नगरसेवक सोपानराव रणपिसे, भारतीय बौद्ध महासभेचे शेखर पोळ, अनिल मसने,आनंद घोरपडे, कृषी अधिकारी सुनील जगताप आदींनी मनोगत व्यक्त केले.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या उपस्थित सर्व धम्म बांधवांच्या वतीने पुरंदर तालुक्यामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचार प्रबोधन पर एकच मोठी जयंती साजरी करायची असे सर्वानुमते ठरले.
यावेळी उपस्थितांमध्ये पुरंदर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभैय्या महाजन सासवड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष हापूकाका जगताप, माजी नगरसेवक संतोष गिरमे,सासवड शहर युवक काँग्रेस अध्यक्ष तुषार पुरंदर तालुका अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष मोबीन बागवान, पोपट भोसले, डी.जी. गायकवाड, सुमित साबळे, अक्षय गायकवाड, विक्रांत रणपिसे, लक्ष्मण लोंढे, अनिरुद्ध दोडके, साई सकट, राजेंद्र लोंढे, जितेंद्र पोळ, भगवंत सोनवणे यासह
कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर धम्म बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे शेखर पोळ होते तर सूत्रसंचालन योगेश घोरपडे यांनी केले.