कृष्णा चौतमाल
हदगांव – तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुसंघाने दी. १९ ऑक्टोबर रोजी विधान परिषद आमदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली युवासेना संवाद दौरा पार पडला.
चौकट
हदगांव हि. नगर विधानसभा हि जागा शिवसेनेचीच होती अन यापुढेही राहणार- आ. हेमंत पाटील
जो काम करेल तोच पुढे जाईल हे माझा सोयरा आहे म्हणून मी त्याला तालुकाप्रमुख करेल जिल्हाप्रमुख करेल असे नाही. येत्या १० दिवसात सर्व युवासेना ग्राऊंड रिपोर्ट मला सुपूर्द करावा लागेल. – आ. हेमंत पाटील
ते पुढे बोलताना म्हणाले की गेल्या ५ वर्षात जेंव्हा मी खासदार होतो तेंव्हा भरपूर असा विकासनिधी आणून भरपूर अशी विकासकाम मी केली. पण दुर्भाग्यपूर्ण मला लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्याने रद्द करण्यात आली. यावर मी नाराज नसून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांचा आदेश असल्याने मी माघार घेतली. आणी त्यांनी मला पुढे मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा ( हळद ) व प्रशिक्षण केंद्र अध्यक्ष केल. यापुढे पण मा. एकनाथ भाई शिंदे जे आदेश देतील ते मानणारा मी कार्यकर्ता आहे.
यावेळी उपस्थित हदगांव हि. नगर विधानसभेचे भावी आमदार तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख मा. बाबुरावजी कदम साहेब. शिवसेना तालुकाप्रमुख विवेक देशमुख , युवासेना जिल्हाप्रमुख संदेश पाटील हडसणीकर ,महिला जिल्हाप्रमुख शीतल ताई भांगे , शिवसेना उपतालुकाप्रमुख बाबुराव काळे , युवासेना उपतालुका प्रमुख कल्पेश देसाई , व असंख्य शिवसेना युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.