प्रतिनिधी
उबेद कुरेशी / लोणार
लोणार तहसिलदार यांनी दिलेले लेखी पत्रावर काय केली करवाई साहेब जितेंद्र दामोधर वाढवे प्रदेशाध्यक्ष युवा बिगर ७/१२ शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य.
मौजे गुंधा येथील गुफाबाई वाघमारे यांची स्वतःची समाजाने हडप केलेली जागा मोकळी करुन देणेबाबत व त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात दिनांक १/१०/२०२४ रोजी तहसिल कार्यालयासमोर एकदिवशाीय धरणे आंदोलन करण्यात आले होते तसेच गुंफाबाई वाघमारे यांचे जागेवरील अतिक्रमण मोकळी करुन देण्यात यावे अशी मागणी जितेंद्र दामोधर वाढवे यांनी तहसिलदार यांचेकडे दिलेले पत्रात नमूद करण्यात आली होती. त्या अनुषगाने तहसीलदार लोणार यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती लोणार यांना पत्र दिले असून गटविकास अधिकारी पंचायत समिती लोणार यांनी त्यावर सरपंच / सचिव यांना याबाबत आपण चौकशी करीता आवश्यक त्या दस्ताऐवजासह दिनांक १८/१०/२०२४ रोजी न चुकता हजर रहावे गैरहजर राहील्यास आपणाविरुध्द प्रशासकीय कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.असे पत्र दिले असून सदर चौकशी काय व कसी झाली किंव्हा झाली नाही यांची खात्री जितेंद्र दामोधर वाढवे यांना बसत नाही कारण चौकशी करण्या साठी आलेले अधिकारी यांनी कोणत्याच प्रकारच मोजमाप केले नसुन गुंफाबाई वाघमारे यांनाच सांगितले की तुमची मागणी चुकीची आहे . तुमच्या जागेत कोणतेच अतिक्रमण झालेले नाहीत. आता न्याय मागावतर कोणाला