लोकांन मध्ये उत्सुकता भारतीय जनता पार्टी कोणाला देईल उमेदवारी?
ढाणकी प्रतिनिधी : प्रशांत आरेवाड
उमरखेड महागाव मतदारसंघात काँगेस पार्टी मध्ये दिग्गज आणि नवख्या उमेदवारामधी तिकीट साठी जंगी कुसती चालत असताना तिकीट जिकंण्यात नवख्या उमेदवार म्हणजे साहेबराव कांबळे यांनी बाजी मारली असून यावेळी काँग्रेस कडून आमदारकीसाठी लढणार आहे.
मागील काही दिसापासून या तिकीट साठी साहेबराव कांबळे आणि विजय खडसे या समर्थका मध्ये सोशिअल मीडिया वर शाब्दिक लडाई होत असताना लोकांन मध्ये उत्सुकता आणि मनोरंजन चे साधन झाले होते लोकांना यांची लडाई बगता तिकीट साहेबराव कांबळे ला भेटेल असे वाटायचे कधी विजय राव खडसेला भेटेल असे वाटायचे.
काँग्रेस मधल्याच कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांना तिकीट मिळविण्यासाठी खटाटोप चालू ठेवला असताना.
विजय खडसे साठी तिकीट मिळावे म्हणून त्यांच्या सहकाऱ्यांनी मुबई ते दिल्ली गाठली तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशिअल मीडियावर चर्चा करून विजय खडसे ची ताकत दाखवली. पण शेवटी काँग्रेस पक्षाचे गेम चैनजर म्हणून नावाजलेले गोपाल अग्रवाल यांनी आपल्या समर्थकासाठी दिली मुंबई गाठून तिकीट साहेबराव कांबळे यांच्या पदरात आणून पाडले अशी चर्चा आता समर्थकात चालू झाली आहे.
काँग्रेस मध्ये उमरखेड महागाव मतदार संघात तिकीट कोणाला मिळेल याची उत्सुकता लागली असताना सकाळी साहेबराव कांबळे यांचे नाव समोर येताच काँग्रेस पक्षात आनंदा चा वातावरण निर्माण होऊन शुभेच्छा चा वर्षाव होतं असताना लोकात आता ही उत्सुकता लागली आहे की, भारतीय जनता पार्टी काँग्रेसच्या दमदार उमेदवार साहेबराव कांबळे च्या विरोधात कोण्या उमेदवाराला तिकीट देईल.