अवधूत खडककर
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड:- भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७७ वा वर्धापन दिन उमरखेड शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. तहसिल कार्यलयाच्या पटांगणात आयोजित (जुने उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालय) मुख्य कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी सकाराम मुळे , यांनी ध्वजारोहण केले. या नंतर पोलिस निरीक्षक निलेश सरदार पी एस आय सागर इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस विभागाने उपविभागीय अधिकारी यांना मानवंदना दिली. ध्वजारोहणा नंतर उमरखेड तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानदार यांना उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे ,मा. आ. नामदेवराव ससाने उमरखेड तहसिलदार आर यु सुरडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमान गायकवाड,न.प. मुख्य कार्यकारी अधिकारी महेश जामनोर त्यांच्या हस्ते आय एस ओ नामांकन प्रमाणपत्र देण्यात आले. ध्वजारोहणाच्या मुख्य शासकिय सोहळ्याला आमदार नामदेवराव ससाने , उमरखेड तहसिलदार आर यु सुरडकर,मुख्य कार्यकारी अधिकारी महेश जामनोर, उमरखेड उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड , ,नायब तहसिलदार एम डी नकितवाड, नायब तहसिलदार एस. डी. पाईकराव ,नायब तहसिलदार , आर एम पंधरे , माजी आमदार विजयराव खडसे ,नितीन भुतडा साहेबराव कांबळे, नाझर ऐनवाड, गणपत तिडके, अक्षय बोंडगुलवार, दीपक चव्हाण, सोळंके, गाडेकर, स्वंतत्र संग्राम सैनिक न.प. सदस्य प्रतिष्ठीत नागरिक , पत्रकार, तलाठी, तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.