धिरज खेडेकर
विदर्भ संपादक
वडकी:पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात साप बाहेर निघतात,साप दिसताच आपल्या अंगावर काटा उभा होतो,ग्रामीण भागात साप दिसताच त्याला मारून टाकण्यात मोठा कल असतो,पण या ग्रामीण भागात सापाला जीवदान देणारे सर्प मित्र सुद्धा आहेत,वडकी परिसरात अनेक गावांत साप निघतात,साप दिसताच क्षणी सर्प मित्राला पाचारण केले जाते,या वडकी परिसरात गौरव जवादे, प्रथमेश राऊत,भूषण पाटील,अरविंद पड्याळ, शिवम वाघडे,विवेक गेडाम,अनिकेत मडावी,मोहित कांबळे,साहिल सोयम हे सर्प मित्र कार्यरत आहे ,हा साप प्रथमेश राऊत परसोडा यांच्या घरी आढळला होता,या सापाला सर्प मित्रांनी जीवदान दिले,या सापाला विहिरगाव येथील बिट क्रमांक 652 मध्ये सोडले तेव्हा वनरक्षक आरती भसाळकर व सर्व सर्प मित्र उपस्थित होते,आसपास च्या गावात सर्प आढळल्यास त्याला मारून न टाकता या सर्प मित्रांशी संपर्क करावा.