बंडु शिंगटे
घुंगर्डे हादगाव
अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील ग्रामस्थांकडून महावितरणचे कर्मचारी लाईनमन पांडुरंग रणमाळे यांना ग्रामस्थांकडून नुकताच निरोप देण्यात आला. लाईनमन रणमाळे यांनी चार वर्षे घुंगर्डे हदगाव येथील ग्रामस्थांना एक चांगल्या प्रकारे महावितरण ची सेवा दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. घुंगर्डे हदगाव येथून त्यांची बदली अंबड येथे झाली आहे. लाईनमन रणमाळे हे शांत, संयमी वृत्ती असल्यामुळे गावकऱ्यांना त्यांनी पूर्णवेळ सेवा दिली. गावातील सामान्य व्यक्तीने जरी लाईनमन रणमाळे यांना लाईट विषयी फोन केला तर ते तात्काळ सेवा देत होते . त्यांचे या चांगल्या कामाचे ग्रामस्थांकडून कौतुक केले जात होते. एक चांगला लाईनमन म्हणून रणमाळे साहेब हे घुंगर्डे हादगाव अणि गोंदी सर्कल मध्ये त्यांची ओळख आहे. याबद्दल ग्रामस्थांकडून त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना निरोप देण्यात आला. व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ग्रामस्थ रमेश आबा पाटील मस्के, गणेश पाटील फिसके, गणेश क्षीरसागर, श्याम पाटील मस्के, ममु भाई पठाण, पत्रकार बंडू शिंगटे, महावितरणचे कर्मचारी किशोर भैया पवार सह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.