मधुकर केदार
प्रतिनिधी अहमदनगर
आव्हाणे बु ग्रामपंचायत सरपंच श्री. रामदास वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्व.मारूतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री.बबनराव भुसारी हे होते. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री.संजुभाऊ कोळगे,श्री.अंबादास कळमकर,श्री.कचरू चोथे,रामदास कोळगे,विद्यालयाची माजी विद्यार्थीनी दुय्यम निबंधक ठाणे श्रीमती.रोहिणी शिवाजी काकडे,पत्रकार श्री. आदिनाथ दिंडे,व्यंकटेश मल्टिस्टेट चे मॅनेजर श्री.प्रविण दौंड तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात दहावी,बारावी मध्ये प्रथम आलेल्या तीन विद्यार्थ्यांना व्यंकटेश मल्टिस्टेट च्या वतीने रोख रक्कम व ट्राॅफी देऊन गौरवण्यात आले. तसेच मुमताज कंकरभाई सय्यद यांच्या स्मरणार्थ श्री कंकरभाई सय्यद सर यांच्या कडून,कै. बन्सी पाटील लांडे यांच्या स्मरणार्थ श्री. कारभारी पाटील लांडे यांच्या कडून, कै. शांताबाई गणेशमल बोथरा यांच्या स्मरणार्थ श्री. शरद गणेशमल बोथरा यांच्या कडून रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आले.तसेच घुले पाटील युवा मंच शेवगाव-पाथर्डी आयोजित शालेय युवा महोत्सव अंतर्गत घेण्यात आलेल्या वत्कृत्व,निबंध,रंगभरण स्पर्धेत बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना रोख रक्कम व ट्राफी देऊन गौरवण्यात आले. शेवगाव तालुक्याचे भावी आमदार श्री.चंद्रशेखर घुले पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री.राजेंद्र सुखदेव वाणी यांच्या तर्फे विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री.जयराम नांगरे सर यांना अहमदनगर जिल्हा गणित अध्यापक मंडळ कडून देण्यात आलेला गुणवंत अध्यापक पुरस्कार मिळाला म्हणून त्यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थ्यांची भाषणे व देशभक्तीपर गीते झाली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.जाधव.के.के.यांनी केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.संदीप बोरुडे सर यांनी केले.या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा.योगेश नरवडे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक प्रयत्न घेतले.