शहर प्रतिनिधी
जितेंद्र लखोटिया ,तेल्हारा
जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा तळेगाव खुर्द येथे 78 व्या स्वातंत्र्य दिनी गावातून तिरंगा रॅली काढण्यात आली. तिरंगा रॅलीमध्ये शाळेतील विद्यार्थिनींनी केलेली वेशभूषा ही सर्व ग्रामस्थांसाठी लक्षवेधक ठरली. स्वातंत्र्य दिनी रॅलीमध्ये विद्यार्थिनींनी देशभक्ती पर घोषणा दिल्या.कन्या शाळेतील झेंडावंदन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नागपुरे मॅडम यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ.शुभांगीताई बंड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,इद्रीस भाई पंचायत समिती सदस्य,सौ. सुनंदाताई वाकोडे सरपंच ,सौ. कल्पना शिंगोकार, उपसरपंच, रविंद्र मगर, अध्यक्ष तंटामुक्त समिती,सुभाष मगर, परसराम वाकोडे, तेजराव धांडे माजी सरपंच,प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी जोरदार भाषणे दिली. हर घर तिरंगा मोहीम अंतर्गत रंगभरण स्पर्धा व व्यसन मुक्ती पोस्टर स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या प्रत्येक वर्गातील एका विद्यार्थिनीस स्व. प्रकाशजी धांडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तेजराव धांडे, माजी सरपंच यांच्या कडून सन्मान चिन्ह, कंपास व कलर बॉक्स चे वाटप करण्यात आले. स्व. शंकरराव चिमणकार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संजय चिमणकार यांनी त्यांच्या वडिलांचे वर्ष श्राद्ध न करता त्यासाठी लागणारा खर्च कन्या शाळेतील सर्व विद्यार्थिनींना पाणी बॉटल, लेटरबुक, पेन, पेन्सिल शालेय उपयोगी साहित्याचे वाटप केले आणि समाजा पुढे एक आदर्श निर्माण केला. यावेळी शिक्षण सप्ताह निमित्त शाळेतील विद्यार्थिनींना भोजनामध्ये मिष्ठान्न देणारे तेजराव धांडे व परसराम वाकोडे यांचा शाळेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शाळेतील विद्यार्थिनींना शालेय साहित्य दिल्याबद्दल संजय चिमणकार यांचा शाळा व्यवस्थापन समिती कडून शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.पंचायत समिती सदस्य माननीय इद्रिस भाई यांनी त्यांच्या विकास निधी मधून अडीच लाख रुपये निधी शाळेसाठी मंजूर केला. तसेच शाळेला इन्वर्टर साठी तेजराव धांडे यांनी दहा हजार रूपये, वनिताताई वाकोडे यांनी एक हजार रुपये, संजय चिमणकर यांनी एक हजार रुपये, आणि शाळा व्यवस्थापन समिती मधील सर्व सदस्यांनी प्रत्येकी एक हजार रुपये देणगी दिली. स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व विद्यार्थिनींना लेटरबुक व पेन परसराम वाकोडे यांनी दिले. यावेळी शाळेत विविध उपक्रम घेणारे प्रवीण चिंचोळकर सर यांचा शाल व श्रीफळ देऊन अमोल भोंडेकर व उपस्थित ग्रामस्थांनी सत्कार केला. यावेळी दोन्ही गावातील गावकरी उपस्थित होते. कन्या शाळेत होत असलेल्या विविध उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले. ग्रामस्थांनी शाळेतील सर्व विद्यार्थिनी साठी चॉकलेट वाटप केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रद्धांजली शिंगोकार मॅडम, महेश खोंड, विमल बंड यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रवीण चिंचोळकर सर यांनी केले.