शहर प्रतिनिधी
जितेंद्र लखोटीया, तेल्हारा
स्थानिक आदिवासी आश्रम शाळा व डॉ.जगन्नाथ ढोणे विद्यानिकेतन अडगाव बु. येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठा उत्साहात पार पडला. 78 व्या स्वतंत्र दिनानिमित्त दिनांक 13 14 व 15 ऑगस्ट रोजी शासनाच्या निर्देशानुसार ध्वजारोहण प्राचार्य संजय निमकर्डे डॉ. जे. डी. विद्यानिकेत यांच्या मुख्याध्यापिका आशाताई ढोकणे,प्राथमिक मुख्याध्यापक गजानन अपाले यांच्या हस्ते करण्यात आले.स्वतंत्र दिनाच्या दिवशी सकाळी 8:10 वाजता ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत व भाषणे दिली तसेच डॉ. जे.डी. विद्यानिकेतनच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत तसेच भाषणे सादर केली. सर्व विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवर पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य संजय निमकर्डे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाला जी प सदस्या प्रमोदिनी कोल्हे सरपंच शोभाताई खंडारे माजी प. स., माजी जी. प. सदस्य गोपाल भाऊ कोल्हे,सभापती उज्वलाताई काळपांडे माजी सरपंच अशोकराव घाटे ग्रामपंचायतचे गटनेते संजय भाऊ राजनकर गजानन, माणिक भाऊ घाटे, श्रीकृष्ण निमकर्डे, रवींद्र निमकर्डे,मुंगसे, प्रदीप सावळे उपसरपंच मजहरअली व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच पालक वर्ग उपस्थित होते. डॉ जगन्नाथजी ढोणे यांनी लावलेले शिक्षणाचे छोटेसे रोपटे आज वटवृक्ष होऊन बहररले आहे त्याला अडगाव वासियांनी खत पाणी घातले व परिसरा तील आदिवासी विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय झाली.डॉ जगन्नाथजी ढोणे यांच्या स्वप्नाला कुठेही गालबोट लागू नये याबाबत येथील कर्मचाऱ्यांनी दक्षता घेतली पाहिजे असे मोलाचे मार्गदर्शन माजी सरपंच अशोकराव घाटे यांनी केले. प्रचार्य संजय निमकर्डे यांनी सर्वांना अठराव्या स्वातंत्र्य दीना निमित्त शुभेच्छा देऊन उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले त्याचबरोबर आश्रम शाळेच्या प्रगतीवर प्रकाश टाकून आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी ऋतिका नामदेव चव्हाण एमबीबीएस झाली.तसेच शेकडो विद्यार्थी शिक्षक पोलीस वकील व शासनाच्या विविध क्षेत्रांमध्ये आपले सेवा देत आहेत याबाबत उपस्थितीना अवगत केले. कार्यक्रमाकरिता सर्व शिक्षक वृंद अधीक्षक अधीक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रणधीर धाकडे व सौ कविता मोदे यांनी केले. अशाप्रकारे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी मा.मोहनजी व्यवहारे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली कार्यक्रम सुरळीत पार पडला.