अवधूत खडककर
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड:-दिनांक १५ ऑगस्ट २०२४ ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने साखळी विद्यालय उमरखेड येथील शैक्षणिक क्षेत्र २०२३-२४ च्या इयत्ता १० वी चे माजी विद्यार्थ्यांनी एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत शाळेने आपल्याला भरपूर दिले आपण शाळेला थोडेफार देऊ ही आदर्श
संकल्पना सत्यात उतरवित शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश तसेच शालेय साहित्याचे वाटप करून एक आगळा वेगळा ठसा उमटविला आहे.
शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी शाळेने आपल्याला भरपूर दिले शाळेला आपण थोडेफार देऊ ही संकल्पना बाळगून स्वातंत्र दिनाच्या निमित्ताने शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश तसेच शालेय साहित्याचे वाटप केले.माझी विद्यार्थ्यांनी हा आदर्श उपक्रम शाळेत राबवून यशस्वी केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. अं.गो. साकळे, मुख्याध्यापक ग. शि.पाणबुडे, महाराज सर गायकवाड सर व्यवहारे सर पंचपुत्रे मॅडम मेने मॅडम सह समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.