शहरातील रुग्णसेवा एक दिवस बंद ठेवून निषेध आंदोलन…
योगेश मेहरे
तालुका प्रतिनिधी अकोट
कोलकत्ता येथील महिला डॉक्टर वर झालेल्या अत्याचार व खुनाच्या घटनेच्या निषेधार्थ अकोट शहरामध्ये दिनांक 17 तारखेला सकाळी 6 पासून 18 तारखेच्या सकाळी 6 वाजेपर्यंत 24 तास अकोट मधील रुग्णसेवा बंद ठेवण्यात आले. कोलकत्ता येथील महिला डॉक्टर वर अत्याचार करून त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजीअकोट शहर आणि तालुक्यातील सर्व डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ यांनी एक दिवस रुग्णसेवा बंद ठेवली .(इमर्जन्सी सेवा वगळता). या घटनेतील आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, याबद्दल शहरातील डॉक्टरांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, याकूब पटेल चौक, यात्रा चौक, सोनू चौक, उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे कार्यालय , अशा मार्गाने मूक मोर्चा काढून उपविभागीय पोलीस अधिकारी साहेबांना निवेदन दिल डॉक्टरांवरील वाढते हल्ले आणि महिला डॉक्टर वर झालेल्या अत्याचार आणि खुनाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत आणि कोलकत्ता येथील घटना अतिशय निंदनीय असून मानवतेला काळीमा फासणारी आहे या घटनेतील आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा करण्यात यावी या संदर्भात संपूर्ण भारतामध्ये आज वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आली आहे. या आंदोलनामध्ये आय एम ए अकोट, निमा, डेंटल संघटना, होमिओपॅथिक असोसिएशन, पॅरामेडिकल असोसिएशन, नर्सिंग संघटना, ॲम्बुलन्स संघटना, इत्यादी संघटनांनी सहभाग घेतला होता.