डॉ विनायक गायकवाड
पुरंदर
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री क्षेत्र कानिफनाथ गड बोपगाव तालुका पुरंदर जिल्हा पुणे अशा या पवित्र ठिकाणी भाविकांची येण्या जाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे महानगरपालिकेच्या वतीने तसेच नवनाथ देवस्थान पंच कमिटी ट्रस्ट यांच्या व माजी मंत्री आदरणीय विजय बापू शिवतारे यांच्या प्रयत्नाने स्वारगेट ते कानिफनाथ मंदिर अशी बस सेवा सुरू झाली यामुळे दूरवरून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही कारण कानिफनाथ मंदिर हे सासवड कोंढवा रोड पासून साडेतीन किलोमीटर अंतर आहे त्यामुळे बस सेवा डायरेक्ट मंदिरापर्यंत झाल्यामुळे गावातील तसेच बाहेरून येणाऱ्या भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे तसेच वाडी वस्तीवरील रहिवासी शालेय विद्यार्थी यांचीही सोय होईल जर बस सेवा कायम चालू राहिली तर कारण ही व सेवा रविवार गुरुवार या दिवसासाठी चालू झाली आहे यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे निश्चितच भाविकांची संख्या वाढेल या बस सेवा सुरू होण्या च्या कार्यक्रमा वेळी आदरणीय विजय बापू शिवतारे माजी जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री तसेच देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष दीपक शेठ फडतरे,पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री दत्ता काळे साहेब,ट्रस्ट संचालक प्रकाश भाऊ फडतरे,सोनबा फडतरे,महादेव हरिश्चंद्र फडतरे,रमेश शेठ फडतरे, सचिव -श्री जयवंतराव फडतरे, खजिनदार- नागेश भाऊ फडतरे, शिवाजी नाना जगदाळे,उत्तम बापू फडतरे, दीपक बबन फडतरे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.