सासवड : पुरंदर तालुका गुण गौरव समितीच्या वतीने, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णूदादा भोसले व रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते पंढरीनाथ जाधव , यांनी गेले अनेक वर्षे बहूजन चळवळीत निस्वार्थीपणे उल्लेखनीय काम केल्याबद्दल , त्यांचा पुरंदर तालुका गुणगौरव समितीच्या वतीने, रविवार दि. १८ / ८ / २०२४ रोजी सकाळी ठिक ११ वाजता – हाॅटेल साई पॅलेस सासवड हिवरे रोड सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सत्कार समितीचे सदस्य, मनोहर तथा नानासाहेब ताथवडकर व सुनिल जगताप यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली,
विष्णूदादा भोसले व पंढरीनाथ जाधव यांचा नागरी सत्कार आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ विचारवंत वसंतराव साळवी यांच्या शुभहस्ते , व पुरंदर तालुका गुणगौरव समितीच्या वतीने, शाल सन्मानपत्र व संविधान ग्रंथ देऊन करण्यात येणार आहे,
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सुनिलतात्या धिवार हे भुषविणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डॉ सतिश केदारी , व पुणे जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम हे उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे आयोजन, गुणगौरव समितीचे सदस्य, मनोहर ( नाना ) ताथवडकर , सुनिल जगताप, शशीभाऊ गायकवाड, सोपान रणपिसे, गौतम भालेराव, कैलास धिवार, आप्पासाहेब भांडवलकर, डॉ. विनायक गायकवाड, दत्तानाना भोंगळे, संतोषदादा डुबल, सुनिल लोणकर, सुहास बेंगाळे, नंदकुमार नेटके, बळीराम सोनवणे, अतुल पवार, राहुल गायकवाड, पुरुषोत्तम पवार, गुलाबराव सोनवणे, भुजंग गायकवाड , गौरव भोसले, राजेंद्र जावळेकर, या गुण गौरव समितीच्या वतीने करण्यात आले आहे, या कार्यक्रमास पुरंदर तालुक्यातील शाहू फुले आंबेडकर यांच्या चळवळीत काम करणाऱ्या बहूजन पदाधिकारी व विष्णूदादा भोसले व पंढरीनाथ जाधव यांचे मित्र परिवार यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे गुणगौरव समितीच्या वतीने, आवाहन करण्यात आले आहे,