महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि.17:- ग्राम जिवन विकास संस्था चिचाळा ता देवळी जिल्हा वर्धा व्दारा संचालीत देवळी कमला नेहरू मागसवर्गीय मुलीचे वसतीगृह देवळी येथे आदिवासी दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम उत्साहात आदिवासी दिन साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अशोक दि. जाधव राष्ट्रीय महासचिव ऑल इंडिया बंजारा टायगर्स तर प्रमुख पाहुणे म्हणून कुमारी एस एफ राठोड वसतीगृह अधिक्षीका मॅडम व उपाध्यक्ष दिगांबर जाधव कोषाध्यक्ष तानुबाई जाधव रिकबचंद एस पाटील सदस्य होते बिरशा मुढा यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून पुजन करण्यात आले.अध्यक्षभाषणात राष्ट्रीय महासचिव जाधव यांनी जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्या यांच्या आदिवासी समाजातील आपली संस्कृती जतन केले पाहिजे आपली बोली भाषा आपल्या घरात बोलणे व गावातील समाजातील बांधव सोबत बोलणें रुढी परंपरा टिकवून ठेवण्यासाठी पुढाकार घेऊन समजुन घेतले पाहिजे याची दक्षता घेतली पाहिजे पराक्रमावर व स्त्री,आदर या विषयावर मार्गदर्शन केले त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून एस एफ राठोड वसतीगृह अधिक्षीका मॅडम यांनी आदिवासी दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या आदिवासी समाजांचे अस्तित्वात टिकवण्यासाठी असेल तर समाज उपयोगी पडेल पाहिजे तेव्हा आपण काही करू शकतो म्हणजे या विषयावर विद्यार्थ्यांना माहिती दिली आदिवासी दिनाच्या गोडी भाषा बद्दल संस्कृती जतन करणे आवश्यक आहे या बाबतीत दिलेली शिकवण आपण सर्वांनी अंगिकारावी ते आपले कर्तव्य आहे. असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी भाषणं कु समीक्षा विलास मसराम व समीक्षा मसराम ,किर्ती कुसवा , जान्हवी मडावी, समीक्षा ओंकार मसराम, श्रावणी मडावी यांनी केले त्यानंतर विद्यार्थीनींनी आदिवासी दिनाच्या निमित्ताने गित गायन केले आदिवासी भाषेत गित गायन केले यांच्या जीवनावर आधारित माहितीपट सादर केली चांगले भाषणे झाली त्यात गौरी मडावी यांनी सुत्रसंचलन केले तर आभार प्रदर्शन संजीवनी चापले यांनी केले या कार्यक्रमाला उपस्थित कु डि,एस , पाटील स्वयंपाकी व किशोर पारीसे चौकीदार यांनी उपस्थित होते