भाजयुमेचे निवेदनातून ईशारा
महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि.16:- तालुक्यातील जेना येथील तलाठी वामन राजूरकर हे लहान मोठ्या कामासाठी गावातील सामान्य गावकर्याना कायद्याचा धाक दाखवून गावातील गावकर्याना त्रास देऊन त्यांना वेठीस धरीत आहे. त्यांच्या विरोथातील अनेक तक्रारी भारतीय जनता युवा मोर्चाला प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य गावकर्याना त्रास देणार्या या तलाठ्याची अनत्र्य बदली करावी अशा मागणीचे निवेदन भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश सचीव ईमान खान यांच्या नेतृत्वात भारतीय जनता युवा मोर्चा तफे दिनांक 10 ला येथील तहसील कार्यालयात सादर करण्यात आले. सदर तलाठी हे कोणत्याही शासकीय कामासाठी लागणार्या दाखले देण्यासाठी सर्वसामान्य गावकर्याना त्रास देत आहे. सध्या लाडकी बहिण योजनेसाठी अनेक दाखल्याची गावकर्याना गरज भासत आहे. मात्र सदर तलाठ्याच्या हेखेकोर स्वभावामुळे गावातील सर्वसामान्य गावकर्याना त्रास सहन करावा लागल असल्याचे सदर निवेदनातून म्हटले आहे. सदर तलाठ्याची त्वरित बदली न केल्यास या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही सदर निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी ईमान खान ,प्रदेश सचीव भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश,अमित गूडांवार जिल्हा महामंत्री भारतीय जनता युवा मोर्चा ,चंदपूर चेतन स्वान,अमर महाकूलकर,राहूल सतूघरे, अंकित पाठक,विकास पिपंलकर,राकेश जूमडे आदि उपस्थित होते.