ढाणकी / प्रतिनिधी :
७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रक्षाबंधनाच्या अगोदर लाडकी बहीण योजनेचे दोन हफ्ते बहिणींच्या खात्यावर राज्य सरकार तर्फे जमा करण्यात आले. ज्या लाभार्थ्याने योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरले आणि ज्यांचे फॉर्म अप्रुव्ह झाले, अशाच लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम थेट जमा करण्यात आली. यामुळे सगळीकडे महिलांची गर्दी पाहण्यासाठी मिळाली कोणी तीन हजार आले म्हणून गर्दी केली तर कोणी आमच्या खात्यात आले की नाही म्हणून गर्दी केली.अचानक एवढी मोठी महिला ची गर्दी बघून बँक कर्मचारी यांनी काउंटर टेबलं सोडून पाच ते दहा मिनिट काम बंद केले होते.
आज लाडकी बहीण योजनेचे दोन हफ्ते बहिणींच्या खात्यावर पडल्यामुळे व रवी रानाच्या वक्त्यव्याची धासकी घेत महिलांनी पैसे काढण्यासाठी मार्केट मध्ये गर्दी केल्यामुळे ट्राफिक जाम झाली होती . तर काही महिलांनी csc आणि सेतू वर फॉर्म व के.वाय. सि साठी झुंबड गर्दी केली होती.
चौकट :
आज लाडकी बहीण योजनेचे दोन हफ्ते बहिणींच्या खात्यात जमा होताच दिवसभर मार्केट मध्ये महिला ची गर्दी बघायला मिळाली. काही महिला पैसे आले म्हणून खुश होते तर काही महिलांचा अर्ज स्थगित व बाद झाल्यामुळे नाराज होते. एकंदरीत परिस्थिती आज कही खुशी कही गम सारखी होती.