प्रतिनिधी
प्रशांत आरेवाड / ढाणकी
आता विधानसभेची गंगा वाहू लागली आहे. यात सगळे डुबकी लावून आपले भाग्य उज्वळण्याच्या तयारीत आहे.पण जनतेची गंगा सगळ्या पापी आणि पुण्यवान भक्तांना ओळखून आहे. साजसेवाच्या नावाखाली पैसा कामावणाच्या नादात विधानसभा लक्षात ठेऊन कोणी आंदोलन करत आहे तर कोणी उपोषण ला बसत आहे. समाज सेवेच्या नावाखाली आपले बँक बॅलन्स वाढविण्यासाठी आपल्या धंद्यात मनमर्जी मनाने माया पुंजी कमवून सुद्धा समाधान न राहिलेले पदाधिकारी, डॉक्टर आणि प्राध्यापक विधानसभा मध्ये उडी घेण्याच्या तयारीत आहे. पण उमरखेड महागाव मतदार संघातील जनता आता अश्या भोंदू समाजसेवक ला धडा शिकवण्यासाठी सज्ज तयारी करून आहे. जर अश्या भोंदू समाजसेवकाला पार्टी तिकीट देत असेल तर याची विकेट जनता पाडणार असून विधानसभा मध्ये यावर बाजी लावणारे पक्ष शंभर टक्के बाजी हरणार आहे. कारण जनता अश्या भोंदू समाजसेवकाला ओळखून आहे. उमरखेड महागाव मतदार संघात मागील कित्येक वर्षा पासून रस्ते, पाणी, आरोग्य, रोजगार आणि मूलभूत सुविधा ची समस्या असून गावागातील व बंदी भागाचे प्रश्न अदयाप कोणी निकाली लावला नाही. निवडणूक च्या तोंडा पुरते जेव्हा तहान लागेल विहीर खोदणारे भोंदू समाजसेवक पावसाळ्याच्या ऋतू मध्ये बेंडक्या सारखे बाहेर निगणारे भोंदू समाजसेवक निवडणुकीच्या वेळी बाहेर निगणाऱ्या उमेदवाराला निवडून न देण्याचा जनतेने चंग बांधला आहे.