मधुकर केदार
प्रतिनिधी अहमदनगर
जायकवाडी धरणात दुर्दैवाने काही अपघात झाला तर शासनाकडून कुणीही लवकर उपलब्ध होत नाही.मात्र आमच्या परिसरातील “पाणी वीर”आपला जीव धोक्यात घालून कुठलीही अपेक्षा न ठेवता तात्काळ उपस्थित होऊन एखाद्याचा जीव वाचवतात.शासनाच्या वतीने या “पाणी वीरां”ना काही प्रोविजन करता आली तर निश्चितच करूया. या पाणी वीरांचे काम कौतुकस्पद आहे.व शासन स्तरावर हा विषय मांडून त्यांच्यासाठी त्यांना काही सुविधा उपलब्ध करता येथील का ते शासनाने बघावे.यश फाउंडेशन व वनेश्वर हनुमान मित्र मंडळ आयोजित सत्कार समारंभात चंद्रशेखर घुले हे बोलत होते. शेवगाव तालुक्यातील जोहरापूर आश़ोकराव देवढे वस्ती येथे पाणीवीर व नवनिर्वाचित पीएसआय यांचा सत्कार समारंभ. आयोजित करण्यात आला होता.यावेळी.मा.आ.चंद्रशेखर घुले,पा.शेवगाव पाथर्डी चे प्रांतधिकारी प्रशांत मते साहेब,तहसीलदार प्रशांत सागडे,पीएसआय दिगंबर भदाणे,मेजर संजू भाऊ डोंगरे,मंडल अधिकारी टेकाळे साहेब सह अनेक मान्यवर उपस्थित होते. पंचवीस तीस वर्षांपूर्वी एमपीएससी मध्ये फक्त मूठभर लोकांची सत्ता होती.ठराविक लोकच फक्त त्या परीक्षा देत असत.ग्रामीण भागातील एमपीएससी,पीएसआय असेल यांच्या परीक्षा देण्या करिता आशा सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला.त्यामुळे ग्रामीण भागातील मुले चमकायला लागली. ग्रामीण भागातील मुले काबाडकष्ट करून एमपीएससी परीक्षा मोठ्या संख्येने उत्तीर्ण होत आहेत याचा मला अभिमान आहे. शेवगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलांकरता स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेणाऱ्यांना शेवगाव मध्ये एक केंद्र चालू करू असे आश्वासन घुले यांनी यावेळी दिले. पाणीवीर,अरुण लोखंडे,नारायण मिसाळ,राजेंद्र गादे,आत्माराम तोरमड,नवनियुक्त पोलिस निरीक्षक अशोक दिंडे,प्रवीण राशिनकर,स्नेहल खंडागळे,कल्याणी नजन,तसेच प्रतीक्षा आप्पासाहेब फटांगरे यांचा यश फाउंडेशन व वनेश्वर हनुमान मित्रमंडळाच्या वतीने ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमासाठी अनिल मडके,रामजी शिदोरे,गणेश खंबरे,सतीश पवार,निलेश कुंभकर्ण,आबासाहेब राऊत, अशोकराव दुकळे,सचिन फटांगरे,शंकरराव नारळकर,राजेंद्र आढाव,अण्णासाहेब शिंदे आधी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र शिंदे यांनी केले. जोहरापुर (ता.शेवगांव) येथे पाणी वीर व नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक यांच्या सत्कार करताना मा.आमदार चंद्रशेखर घुले, प्रांताधिकारी प्रशांत मते साहेब तहसीलदार प्रशांत सागडे साहेब.