मोर्शी : नेरपिंगळाई येथील श्री विवेकानंद कन्या विद्यालयामध्ये ‘ भारत माता की जय ‘ सारे जहाँ से अच्छा ‘ हिंदोस्ता हमारा ‘ हम सब भारतीय है च्या गगनभेदी जल्लोषात भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्यदिन अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात मन ‘मनगट ‘ आणि मस्तिष्कांत फक्त आणि फक्तच तिरंगा च । अश्या देशभक्तमय वातावरणात सन्मानिय संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ.श्री. धनंजय मा. तट्टे साहेब यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांची शिस्तपूर्ण आणि सुत्रबध्द ‘ उपस्थितांना मंत्रमुद्ध करणारी परेड संचालनाने भरगच्च उपस्थित विद्यार्थी तथा श्री. पाकोडे सर श्री. भोजने सर ‘ श्री. संभे सर ‘ सौ. मंगलाताई माहोरे ‘ सौ. सावरकरताई आणि शिक्षक ‘ शिक्षकेतर कर्मचारी ‘ सन्मा. गावकरी मंडळी यांच्या प्रमुख उपस्थित ‘ ध्वजारोहण ‘ संपन्न झाले.इंग्रजांच्या जुलुमी ‘ अत्याचारी , दास्यशृंखलेतून ‘भारतमातेला सुखरुप बाहेर काढण्यासाठी ‘स्वातंत्र्य संग्राम यज्ञकुंडामध्ये आपल्या प्राणाची समीधा टाकून स्वातंत्र्याचा सूर्य बहाल करणाऱ्या समस्त शूरवीरांना ‘ ये मेरे वतन के लोगो जरा आँख मे भरलो पानी । जो शहीद हुये है उनकी जरा याद करो कुर्बानी । यातून प्रेरणा विद्यार्थ्यांना कायम मिळावी.शूरवीरांच्या बालिदानातून मिळालेले स्वातंत्र्य चिरायू व्हावे . ‘रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा । उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा ‘ जयघोष भारतमातेचा आसमंती गुंजावा । विद्यार्थ्यामध्ये प्रखर राष्ट्रभक्ती ‘ सर्वधर्मसमभावाचे मूल्य रुजावे ‘ शिस्त ‘ स्विकारावी . ही मूल्यं वर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ .धनंजय तट्टे साहेबांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने केलेत. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी श्री.योगेंद्र तट्टे सरांच्या मार्गदर्शनातून सुरेल ‘ सुमधूर अशी देशभक्तिपर गीते गाईली .गीतांनी आसमंत देशभक्तीमय निनादत होता. ‘ देशभक्तीचा जोष अशा आयोजित वक्तृत्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी ‘ स्वतःचा शोध घेण्याचा सर्वोत्तम मानवी संवेदना म्हणजे इतरांना मदत करुन त्यामध्ये आनंदी राहणे म्हणजेच स्वातंत्र्याचा विकास होय ‘ अश्या आशयपूर्ण सद्विचारांची प्रेरणा देणारी भाषणांनीयुक्त अशी’ वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रथम क्रमांक पटकावला कु.ईश्वरी पोटे ‘ दुसरा क्रमांक कु. अक्षरा सपकाळ आणि तृतीय क्रमांक कु. वेदश्री दुगाणे हिने पटकाविला. अश्या अनेक उपक्रमांनी नटलेला ‘ स्वातंत्र्याचा दिवस ‘ देशाचा अभिमान वाढविणारा ‘ तिरंग्यातील तीन रंग ‘ याप्रमाणे आपण न्यायी असावेत . पहिला रंग भगवा हा समस्त भारतीयांना त्याग आणि सेवा ‘ समर्पण ‘ शौर्याची शिकवण देणारा . दुसरा रंग पांढरा धवल क्रांतीची हाक देणारा .तिसरा रंग हिरवा हा हरितक्रांतीची हाक देणारा शेती आणि पर्यावरणाला जपणारा. असा हा तिरंगाध्वज भारतीय इतिहासाचा ‘ वारसाचा आणि उज्वल भविष्य आहे. भारतीयांच्या हृदयावर सुवर्णाक्षरांनी कोरले गेलेल्या ‘स्वातंत्र्यदिन ‘ उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पी.बी.आडे सर यांनी केलेत. तर प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मंजुषा देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. योगेंद्र तट्टे सर यांनी केलेत. समारोप विद्यार्थ्यांना मिठाई वाटपाने करण्यात आला . कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्री. एन.बी. वाकोडे , रोशन भोजने ‘पुष्पाताई सावरकर ‘सायली भाकरे ‘ संस्कृती बहरे ‘ सेजल सुरजुसे ‘ तन्वी खोपे , वैभवी खुरपडे ‘ चैताली नक्षणे ‘ पायल खुरपडे ‘कु. काकपूरे ‘ आस्था वैद्य ‘ संस्कृती माहोरे समृद्धी भोपळे ‘श्रावणी इंगळे ‘श्रेया राऊत ‘ युगांती फुसे आदिंनी अथक परिश्रम घेतलेत भारतमाता की जय ‘ जयहिंद !