उबेद कुरेशी / लोणार
दुधा वलांडेश्वर १९ उद्धव भाऊ माझा पाठीराखा या डॉ. गोपाल बछिरे यांच्या संकल्पनेतून उद्धव साहेबांच्या प्रतिकृती राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. दुधा वलांडेश्वर येथील शिव मंदिरात अभिषेक करून उद्धव भाऊ माझा पाठीराखा या संकल्पनेस सुरुवात करण्यात आली ही संकल्पना म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे हा भाऊ माझा पाठीराखा आहे व त्यांना प्रत्यक्षात राखी बांधू शकत नाही परंतु त्यांच्या प्रतिकृतीस राखी बांधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांच्या माध्यमातून साड्यांचे वाटप दुधा वालांदेश्वर व बाऱ्हई या या दोन ठिकाणी करण्यात आले सुरुवातीला तळपत्या उन्हात व नंतर भर पावसात हजारो महिलांनी उद्धव साहेब ठाकरे यांच्या प्रतिकृती व डॉ. बछिरे यांना राख्या बांधून आपलं रक्षाबंधन हा कार्यक्रम पार पडला महिलांनी उद्धव साहेबांना, “जनमनातील मुख्यमंत्री उद्धव साहेब, आपल्या शासन काळात महिला सुरक्षित अनुभवात होत्या शेतकरी आर्थिक दृष्ट्या सबळ होता, शेतमालाला भाव होता, शेतकऱ्यांवरील कर्ज माफ केले त्यामुळे आपले राज्य पुन्हा येवो आपल्या हातून समाज व देश सेवा घडो हीच रक्षाबंधन निमित्त बहिणीचा आशीर्वाद व शुभेच्छा या आशयाचा संदेश लिहून ग्रीटिंग्स च्या माध्यमाने जमा करण्यात आले व सदरील ग्रीटिंग्स व प्रतिकृतीस बांधलेल्या राख्या ह्या मातोश्रीवर उद्धव साहेबांना डॉ. गोपाल बछिरे यांच्या माध्यमातून पाठवण्यात येणार आहे. मेहकर विधानसभा क्षेत्रातील किमान ५० गावातील २५ हजार महिलांनी उद्धव साहेबांना राखी बांधाव्या व त्यांचा संदेश ग्रिटींग च्या माध्यमातून उद्धव साहेबांना पाठवावा असा मानस डॉ. बछिरेंचा आहे, हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम सतत पोळा या सनापर्यंत मेहकर विधानसभा क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी चालणार आहे याप्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख गजानन जाधव नगरसेविका सिंधुताई जाधव किसान सेनेचे जिल्हा उपप्रमुख नारायण बळी, शहर उपप्रमुख लूकमान कुरेशी, युवा शहर प्रमुख श्रीकांत मादनकर, ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे, महिला तालुका संघटिका पार्वतीताई सुटे, शहर संघटिका शालिनीताई मोरे, सौ. रंजना बछिरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते