प्रतिनिधी
मा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब व घनसावंगी विधानसभा प्रमुख कार्यसम्राट मा श्री सतीश घाटगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पिकविमा नैसर्गिक आपत्ती अनुदान व निराधारांच्या प्रश्नांवर घेतली तहसिलदारांची भेट तालुक्यातील प्रलंबित पिकविमा नुकसान भरपाई, कापुस आणि सोयाबीन पिकांचे नैसर्गिक आपत्ती अनुदान आणि निराधारांच्या प्रलंबित अर्जांसंदर्भात सुदर्शन राऊत आयुष्यमान भारत समीती तालुका अध्यक्ष यांनी तहसिलदारांची भेट घेतली निराधारांच्या आर्जं दोन ते आठ दिवसात तपासणी करुन नविन दाखल अर्ज समितीसमोर ठेवुन नियमाप्रमाणे त्यांना मंजुरी द्या, सोयाबीन व कापुस पिकांच्या शासन अनुदानाची रक्कम तात्काळ शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करा अशा सुचना सुदर्शन राऊत यांनी तहसीलदार मॅडम केली. यावेळी संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे सदस्यांसह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.