जिल्हाप्रमुख तथा विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले शाखा उदघाटन शाखा
महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि.18:-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तालुक्यातील कुचना गावात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी नव्या शाखेचे जल्लोषात उद्घाटन करण्यात आले. “गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक” या अभियानअंतर्गत जिल्हाप्रमुख तथा वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
शाखा उद्घाटनानंतर संपूर्ण गावातून ढोल-ताश्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत अनेकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला, ज्यामुळे शिवसेनेच्या या मोहिमेला नागरिकांचा उत्फुर्त प्रतिसाद दिसूना आला.आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना उबाठा गटाने वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात पक्ष संघटन मजबूत करण्यावर विशेष भर दिला आहे. जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे प्रत्येक गावात जाऊन जनतेशी संवाद साधत आहेत आणि त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. शिवसेनेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या अभियानाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, ज्यामुळे शिवसेनेची ताकद या भागात वेगाने वाढत असल्याचे बोलल्या जात आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख तथा विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी सांगितले की, “घरोघरी शिवसैनिक निर्माण करून जनतेच्या समस्यांचे निराकरण करणे हीच माझी प्राथमिकता आहे. त्यामुळे गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक अभियान संपूर्ण विधानसभा क्षेत्रात राबविले जात आहे. यामाध्यातून जनतेच्या हाकेला धावून जाणारा शिवसैनिक घरोघरी शिवसैनिक निर्माण केला जात आहे.
शाखा उद्घाटनादरम्यान पावसाने हजेरी लावली असली, तरीही नागरिकांनी पावसाची पर्वा न करता मोठ्या प्रमाणात कॉर्नर सभेला उपस्थिती दर्शविल होती. या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे शिवसेनेची ताकद वरोरा-भद्रावती विधानसभेत अधिकच वाढताना दिसत आहे.यावेळी उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड, युवासेना विधानसभा समन्वयक निखिल मांडवकर,शाखा प्रमुख टपू कुळसंगे, उप शाखा प्रमुख अरुण किनाके, सचिव चेतन ढवस, कामगार सेना सचिव धनराज कुमरे,ग्रामपंचायत सदस्य गिरीश पारखी , अजाब सिडाम, पुरुषोत्तम झाडे, वानखेडे,पळसगाव उपसरपंच स्वप्नील वासेकर,तंटामुक्ती अध्यक्ष तुषार माहातळे, आकाश चिंचोलकर, रितिक मेश्राम, स्वप्निल सिडाम, रितिक चोपणे,गौरव मडावी, सौरभ उरकुडे, ओम अंबाडे, साहिल सिडाम, विठ्ठल झाडे, पियुष ढवस, केतन चौधरी, गौरव उरकुडे, मयूर सिडाम, दादू वानखेडे, संजय आत्राम, गणेश पोटे, गौरव पारशिवे, अमित परचाके, राज खामनकर,टोनी डान्सर, सचिन उईके, लॅकी वर्मा, महेश हिवरे, राजू सिडाम, बबलू केवट, कमलाकर आत्राम, नाना ताजने, प्रज्वल पाचभाई, उत्तम मंगाम, भोलेस्वर गायकवाड, गुड्डू तांदुरकर उपस्थित होते.