अवधूत खडककर
उमरखेड
उमरखेड : शहरातील
रेहमानिया कॉलनी नांदेड रोड येथील रहिवासी फिर्यादी फिरोज हुसेन दिवान शेख वय ५८ वर्ष यांनी दि.८/८/२०२४ रोजी घर फोडी बाबत तक्रार दाखल केली होती. उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास परि.पो.उपनि. सागर इंगळे व सहकारी टेंभरे यांच्याकडे दिला होता यां गुन्ह्याच्या चौकशी संदर्भात उमरखेड शहरात लावलेले पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता. यातील आरोपी गायत्री चौक, नंतर सदर मोटरसायकल बस स्टॅन्ड समोर लावून पायी चालत जाऊन नाग चौक नंतर बजाजच्या शोरूम च्या समोरून फिर्यादीच्या घरात दि.७/८/२०२४ रोजी ०२/०३ वा. प्रवेश करताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळून आले आले होते.व ०२/१८ वा. बाहेर पडताना दिसून आलेसदर आरोपी पायी चालत आपल्या ठिकाणी वर जाऊन मोटरसायकल घेऊन नांदेडच्या दिशेने निघून गेले. याप्रकरणी सायबर सेल यवतमाळच्या मदतीने आरोपी क्र.०१ शेख सैफुद्दीन त्याच्याकडे असलेल्या सिम क्रमांकाच्या लोकेशन मिळून मा.पो.नि. संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीचा शोध घेऊन सदरगुन्ह्यातील आरोपी नामे १) शेख सैफुद्दीन शेख अजीमोदीन वय २२ वर्ष रा. वर्कशॉप रोड फ्लावर मिल जवळ सहयोग नगर नांदेड आरोपी २) शेख खिजर अहेमद मोहम्मद गौस, वय ३६ वर्ष रा. देवी नगर देगलूर नाका नांदेड येथून मिळून आले. त्यांच्याकडून एक सोन्याचे मंगळसूत्र, अंदाजे 21. ग्राम. दोन सोन्याचे पेंडॉल ५ ग्राम वक्रमांक M.H.26 C.M..0664 बजाज कंपनीचे पल्सर मिळून आले. सदरची कारवाई मा. कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ उमरखेड उपविभागीय अधिकारी हनुमंत गायकवाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय सोळंके, यांच्या मार्गदर्शनात पार पडली.