गणेश राठोड
तालुका प्रतिनिधी महागाव
उद्याच्या ट्विट मोर्चात असाच सहभाग घेऊन झोपेचे सोंग घेतलेल्या शासनाला जागे करण्याचे काम संगणकपरिचालक करणार !
शासनाने राज्यातील संगणकपरिचालकांचा कोणताच प्रश्न सोडवला नसल्याने येत्या 26 ऑगस्ट 2024 रोजी आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असून,त्या अगोदर संगणकपरिचालक ऑनलाईन व डिजिटल क्षेत्रात काम करणारे असल्याने 20 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा.पासून राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री माँ.देवेंद्रजी फडणवीस साहेब,उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार साहेब,राज्याचे मा.मुख्य सचिव साहेब,ग्रामविकास विभागाचे प्रधानसचिव साहेब,मा.उपसचिव साहेब आपले सरकार सेवा केंद्र या सर्वांच्या अधिकृत ईमेल आयडीवर हजारो ईमेल पाठवत मागणी मांडून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले,अक्षरशः ईमेलचा पाऊस पडल्यासारखे ईमेल केले.
याच आंदोलनाचा एक भाग म्हणून उद्या 21 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 05 दरम्यान संबंधितांना ट्विट करून आपली मागणी मांडन्यात येणार असून सर्व संगणकपरिचालकानी या ट्विट आंदोलनात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे,उपाध्यक्ष मुकेश नामेवार व राज्य सचिव मयुर कांबळे यांनी केले आहे.