शहर प्रतिनिधी
उबेद कुरेशी / लोणार
सुलतानपूर : दिनांक १९ ऑगस्ट २०२४ वार सोमवारला दुपारी तीन वाजेच्या दरम्यान अचानक आलेल्या पावसाने अनेक लोकांच्या घरात पाणी घुसले गल्ल्या आणि ठिकठिकाणी पाणी साचलयामूळे लोकांची फजिती झाली.. सविस्तर वृत्त असे की सोमवारला दुपारी तीन वाजे दरम्यान ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे अनेक लोकांच्या घरात पाणी शिरल्याने अन्नधान्याचे वापरातील कपड्यांचे भांडीकुंडे तसेच मौल्यवान वस्तूंची नासाडी झाली काही लोकांच्या घराची भिंत पडून नुकसान झाले असून यामध्ये अनेक लोकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे लोक हवालदिल झालेले दिसून आले ही सर्व परिस्थिती ग्रामपंचायत च्या ढिसाळ; निष्काळजी आणि नियोजन शून्य कारभारामुळे लोकांवर ओढवलेली आहे असे दिसून येते माहिती मिळताच तातडीने वार्डामध्ये जाऊन वंचित चे नेते तथा ग्रापं सदस्य संघपाल पनाड मंडळाधिकारी जे एम येवूल साहेब तलाठी संतोष पनाड शेख अमीर भाई संतोष पाटील संतोष शिंदे सद्दाम भाई हे सर्व ग्रापं सदस्य गावकरी विष्णू गाडेकर भानदास पवार पत्रकार सुरेश मोरे शेख वशीमभाई या सर्वांनी वॉर्ड नंबर १;६;५;२ मधील लोकांच्या समस्या रात्री उशिरापर्यंत झालेल्या नुकसानीची पाहणी करुन जानुन घेतल्या आणि लोणार तहसीलदार यांना माहिती दिली अशा परिस्थितीमुळे लोकांना त्रास होऊ नये गोरगरिबांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून या वार्डातील रोड रस्ते नाल्या व्यवस्थित करण्यासाठी ग्रापला वंचित चे नेते संघपाल पनाड यांनी अनेक वेळा निवेदन देऊन आंदोलन सुद्धा केलेलले आहे परंतु सुलतानपूर ग्रापं सरपंच यांनी कोणतेही नियोजन या ठिकाणी केलेले नाही असे दिसून येते या वार्डात लोकांचे अतोनात हाल होत आहे अनेक अडीअडचणींना लोकांना सामोरे जावे लागत आहे डास मच्छर डेंगू सदृश्य डासांची निर्मिती होऊन लोकांना रोगराईचा आणि घाण सदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागत आहे अशा या लोकांच्या गंभीर समस्यांचा ग्रापं सुलतानपूरने त्वरित निपटारा न केल्यास आत्मदहन करावे लागले तरी चालेल परंतु आता मागे हटणार नाही.. आता करो या मरो असा शेवटचा इशारा या ठिकाणी भाई संगपाल पनाड यांनी ग्रामपंचायत सुलतानपूरला दिला आहे मंडळ अधिकारी जे एम येवुल तलाठी संतोष पनाड यांनी लोकांच्या झालेल्या नुकसानी चा अहवाल सादर करण्याचा निर्णय घेतला यावेळी विष्णू गाडेकर भानदास पवार शेख अमीर भाई ग्रामपंचायत सदस्य संतोष शिंदे संतोष पाटील शेख वसीम शेख अमीर इत्यादी असे अनेक ग्रापं सदस्य आणि गावकरी उपस्थ.