नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
शहर प्रतिनिधी
जितेंद्र लाखोटिया,तेल्हारा
दि. २०/०८/२०२४ रोजी रात्री ०७:०० वाजता वान प्रकल्प पाणी पातळी ४०७.१० मी असून ७४.०५% पाणीसाठा झाला आहे. वान प्रकल्पा च्या मंजूर जलाशय परिचलन सुची नुसार प्रकल्पा मध्ये ऑगस्ट अखेर ७२.७६ % पाणीसाठा असणे निर्धा रित आहे.धरणाच्या पाणलोट क्षेत्रा मध्ये पाऊस सुरू असून धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने येत्या २४ तासात येणाऱ्या येव्या नुसार वक्रद्वार प्रचलित करून पुराचे पाणी नदीपात्रा मध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल. नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे तसेच नदी पात्र ओलांडू नये. तसेच नदीकाठा वरील गावांना आपल्या स्तरावरून सतर्क करण्यात यावे असे आवाहन वान प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाचे युधिष्ठिर भांगडिया सहाय्यक अभियंता वान प्रकल्प व्यवस्थापन उप विभाग तेल्हारा व शाखा अभियंता नयन लोणारे यांनी केले आहे.हिवरखेड पासून जवळच अकोला, अमरावती, बुलढाणा, या तीन जिल्ह्यां च्या सीमेवर वारी हनुमान येथे वान नदीवर “वान प्रकल्प”हे धरण आहे. येथील जलाशया ला हमूमान सागर असे नाव दिले आहे. ह्या प्रकल्पातील शुद्ध पाण्याने अकोला, बुलढाणा जिल्ह्यातील शेकडो गावे आणि अनेक शहरातील लक्षावधी जनतेची तहान वर्षानुवर्षांपासून भागत आहे. याच प्रकल्पातून 84 खेडी पाणीपुरवठा योजना आहे. एवढेच नव्हे तर ह्या पाण्या च्या सिंचनातून हजारो शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यामुळे वान प्रकल्पाला “वरदान प्रकल्प” म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. या धरणाची विशेषता म्हणजे एखादा अपवाद वगळता हे धरण दरवर्षी शंभर टक्के पूर्ण भरते. यावर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या धरणात मागील वर्षीचा थोडासा जलसाठा शिल्लक होता. अकोला जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस झाला असला तरी या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात म्हणजेच सातपुडा पर्वतातील मेळघाट क्षेत्रात आतापर्यंत समाधान कारक पाऊस झाला नव्हता त्यामुळे ह्या वर्षी “वरदान प्रकल्प” भरते की नाही अशी चिंता शेतकरी बांधवांसह सर्वांनाच लागली होती. परंतु मागील 12 तासा पासून तेल्हारा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे धरण जलसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. आतापर्यंत जलसाठा 74.05
% टक्के वर पोहोचला आहे. पाणलोट क्षेत्रात समाधान कारक पाऊस पडत असल्या मुळे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी दोन दिवस जोरदार वृष्टी होणार आहे. त्यामुळे यावर्षी सुद्धा वारी हनुमान सागर पूर्णता भरण्याची आशा पल्लवित झाली आहे. हनुमान सागर मधून निघालेल्या कालव्यां द्वारे परिसरातील हजारो एकर शेती ओलित केल्या जाते. हनुमान सागर मधुन निघालेल्या कालव्याद्वारे शेतकरी गहू ,चना ,भुई शेंग व उन्हाळी मूग इतर बरेच पिके घेतात. वान परिसरात काल पासून सुरू असलेले संततधार पावसा मुळे परिसरातील शेतकरी आनंदित दिसत आहे. वारी हनुमान सागर अकोला बुलढाणा या दोन जिल्ह्यांसाठी वरदान आहे. तरी यावर्षी ऑगस्ट महिन्या तील पावसाने पुन्हा श्री हनुमान सागर पूर्णता भरेल व शेतकऱ्यांच्या आशा पूर्ण होतील अशा आशेवर शेतकरी दिसत आहे. अशी माहिती युधिष्ठिर भांगडिया सहाय्यक अभियंता वान प्रकल्प व्यवस्थापन उप विभाग तेल्हारा व शाखा अभियंता नयन लोणारे यांनी दिली आहे. अकोला व बुलढाणा जिल्ह्यात हनुमान सागर प्रकल्प मार्फत वान प्रकल्पाचे पाणी आरक्षण पुढील प्रमाणे आहे 1=अकोट शहर पाणीपुरवठा योजना =8.66 दलघमी, जळगाव जामोद, 2=तेल्हारा शहर पाणीपुरवठा योजना= 3.16 दलघमी, 3=शेगाव शहर पाणीपुरवठा योजना= 5.62 दलघमी, 4=84 खेडी पाणी पुरवठा योजना ता.तेल्हारा व अकोट, = 4.239 दलघमी5=जळगाव जामोद पाणीपुरवठा योजना= 4.02 दलघमी, 6=140 गावे जळगाव जामोद तहसील मधील पाणी पुरवठा योजना =8.454 दलघमी 7= तेल्हारा व अकोट 159 गावची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना =3.753 दलघमी, 8=बाळापुर व अकोला तालुक्यातील 69 गावांची पाणीपुरवठा योजना =3.35 असे एकूण 41.256 दलघमी एवढे पाणी श्री हनुमान सागर मधून आरक्षित करण्यात आले आहे. तसेच अकोला शहर अमृत पाणीपुरवठा योजना 24.00 दलघमी याला स्थगिती आहे.अशी माहिती युधिष्ठिर भांगडिया सहाय्यक अभियंता वान प्रकल्प व्यवस्थापन उप विभाग तेल्हारा व वान प्रकल्प शाखा अभियंता नयन लोणारे यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना दिली.