तालुका प्रतिनिधी
अवधूत खडककर / उमरखेड
उमरखेड : सहयोग बहुउद्देशीय विकास संस्था व अनन्या मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने उमरखेड येथे गरजु रुग्णांकरिता अतिशय अत्यल्प दरात सेवाभावी हॉस्पिटल चे उदघाटन श्रीअतुलजी खंदारे यांच्या हस्ते करण्यात आले. या हॉस्पिटल मार्फत विविध आजारावर उपचार केले जातील यामध्ये पोटाचे विकार बीपी शुगर थॉयराईड निदान व उपचार लहान मुलांच्या आजार चेहऱ्यावरील मुरुम डाग वांग गजकर्ण नागिन व डेंगू मलेरिया टायफाईड वातव्याधी संधिवात आमवात यासारख्या आजारावर उपचार व निदान अतिशय कमी दरात केले जातील उदघाट्नकरते वेळी डॉ. स्वाती चक्करवार डॉ. पारस कस्तुरे डॉ. अजय लोको डॉ. आकाश आसेगावकर डॉ. राहुल त चक्करवार संस्थेचे अध्यक्ष देवानंद इंगोले व अनन्या मेडिकल चे संचालक शुभम नाईकवाडे, सचिन डोंगरे, सचिन यशवंत पवनजी मेंढे व अन्य मंडळी उपस्थित होती.