बंडु शिंगटे
घुंगर्डे हादगाव
अंबड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घुंगर्डे हदगाव केंद्र पाथरवाला बु. तालुका अंबड येथील प्राथमिक पदवीधर शिक्षक श्री आप्पासाहेब यशवंतराव उगले यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या वतीने मे जून २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या एम ए एज्युकेशन परीक्षेमध्ये ६८% गुण मिळवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचे मत्स्योदरी अध्यापक महाविद्यालय अभ्यास केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ. निळकंठ वडजे सर,केंद्रसमन्वयक जयनारायण रेगुडे सर, डॉ.माधव चव्हाण सर, डॉ.मंगेश ढोबळे सर, डॉ.कावेरी डहाळे मॅडम तसेच गटशिक्षणाधिकारी श्री गोविंद चव्हाण साहेब बिट विस्तार अधिकारी श्री लक्ष्मीकांत आटोळे साहेब, दिनेश शिनगारे साहेब केंद्रीय मुख्याध्यापक श्री सायबु शिंदे शाळेचे मुख्याध्यापक श्री पांडुरंग धोंडगे व केंद्रातील सर्व शिक्षकांनी व गावकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.