बंडु शिंगटे
घुंगर्डे हादगाव
घुंगर्डे हादगाव, २१ ऑगस्ट २०२४: घुंगर्डे हादगाव येथील जिल्हा परिषद शाळेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन बंधुत्वाचा संदेश दिला.यानंतर शाळेतील मुलींनी मुलांना राखी बांधून त्यांना आपल्या रक्षणाची जबाबदारी दिली. तसेच, मुलांनी मुलींना भेट देऊन आपल्या स्नेहाची भावना व्यक्त केली. या प्रसंगी शाळेतील वातावरण अधिक आनंदमय झाले. यावेळी शाळेतील उपक्रमशील शिक्षक आप्पासाहेब उगले यांनी कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांना बंधुत्व, एकता आणि परस्पर आदराचे मूल्य शिकवले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री देवीदास नागरगोजे, दिलीपकुमार खराद, ज्ञानेश्वर पवार,वैभव पवार श्रीमती मनीषा चव्हाण यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आली. शाळेचे मुखध्यापक श्री सुनील हेलवाडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले व अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कारांची वृद्धी होते, असे सांगितले शाळेतील सर्वांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम उत्साहात साजरा केला, ज्यामुळे घुंगर्डे हादगाव येथील जिल्हा परिषद शाळेत सणाचा आनंद द्विगुणीत झाला.