जिल्हा प्रतिनिधी
प्रशांत बाफना / अहमदनगर
शेवगाव : शहरातील नेवासा रोड धर्मात्मा पेट्रोल पंपा मागे साईनगर शेवगाव व शहरातील नवीन बाजार तळ बसस्थानक परिसरातील क्रांती चौक व नागेबाबा पतसंस्थेच्या समोर वडार गल्लीच्या कोपऱ्यावर व बाळासाहेब भारदे हायस्कूल समोर प्रभाग क्रमांक 16 मधील हनुमान नगर साई नगर या सखल भागात शहरात थोडा जरी पाऊस झाला गटारीचे पाणी रस्त्यावर येऊन आठवडे बाजार भरतो तिथं नागेबाबा पतसंस्थे जवळ नेवासा रोड वरील धर्मात्मा पेट्रोल पंपाच्या पाठीमागे साईनगर प्रभाग केमांक 11 मधील ज्ञान माऊली शाळा परिसर आदी भागातील नागरिकांना रस्त्याने पायी चालणे सुद्धा मुश्किल होते त्यांचा शहराशी संपर्क काही तासासाठी तुटतो याला जबाबदार कोण ??? या भागात टाकण्यासाठी नगरपालिकेकडे मुरूम सुद्धा नाही शेवगाव नगरपरिषद चा कारभार म्हणजे “आंधळे दळते आणि कुत्रं पीठ खाते” असे झालेला आहे गेल्या पाच वर्षापासून प्रभारी राज असून शेवगाव नगरपरिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी नाहीत “प्रभारी मुख्याधिकारी आणि त्यांचे इतर केडरचे चअधिकारी पाथर्डी शेवगाव असे आषाढी कार्तिकी वारी करत असतात” आणि प्रशासक म्हणून नियुक्त असलेले प्रसाद मते विभागीय अधिकारी शेवगाव – पाथर्डी तथा प्रांत यांना तर “शेवगाव नगरपरिषद कार्यालय कोठे आहे” ??? हे देखील माहिती नसावे त्यामुळे त्या सर्व अधिकाऱ्यांना व नगरपरिषद च्या कर्मचाऱ्यांना शहराच्या प्रश्नाशी काही देणेघेणे नाही असे दिसत आहे शेवगाव शहरातील प्रत्येक प्रमुख चौकांमध्ये सुमारे 10 ते 12 हाय मॅक्स दिव्यांचे खांब लावून दोन-दोन वर्षे झाली आहेत परंतु त्याला अडकवायला 200 वॅटचे बल्ब सुद्धा नगरपरिषद शेवगाव कडे उपलब्ध नाहीत शहरातील नागरीक हा “अस्मानी आणि सुलतानी” संकटाच्या कात्रीत सापडलेला आहे “रस्त्याने चालताना चिखलाचा भार वरून न पडणाऱ्या हाय मॅक्सच्या उजेडाचा अंधार” विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष आणि नेत्यांनी या विरोधात उपोषण आणि आंदोलने केली परंतु त्यांचा या भिम नगरपरिषद प्रशासनावर कुठलाही प्रभाव पडताना दिसत नाही त्यांचा कारभारी येरे माझ्या मागल्या असा सुरू आहे