सासवड : १९०२ साली शिवराम जानबा कांबळे यांनी, पुरंदर तालुक्यात अस्पृश्यांची पहीली परिषद घेतली होती, या परिषदेस १८०० अस्पृश्य उपस्थित होते या ठिकाणी घेतलेला ठराव ब्रिटिश सरकाराला पाठविण्यात आला होता, सन १९५७ रोजी सासवडचे चौरे हे आंबेडकरी चळवळीतून आमदार झाले होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जेजुरी येथील रावसाहेब डिखळे यांचे नातेवाईक होते, बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर अनेक पुरंदर मधील नेत्यांनी काम केले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महानिर्वाण झाल्यानंतर ,दिल्ली येथून त्यांचे शव मुंबई येथे आणण्यासाठी पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावचे इंजिनिअर भोसले यांनी स्वतः हाची कार विकून मदत केली होती, त्यामुळे आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात पुरंदरचे योगदान मोठे आहे, अशा या पुरंदर तालुक्यात गेले अनेक वर्षे आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून सोशीत वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या विष्णूदादा भोसले व पंढरीनाथदादा जाधव यांचा नागरी सत्कार माझ्या हस्ते करण्यात येत आहे याचा मला आनंद वाटतो, असे मतं आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ विचारवंत वसंतराव साळवे यांनी नागरी सत्कार सोहळ्यात बोलताना व्यक्त केले.
पुरंदर तालुका गुणगौरव समितीच्या वतीने, विष्णूदादा भोसले व पंढरीनाथदादा जाधव यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन, रविवार दि १८ ऑगस्ट रोजी सासवड येथील हाॅटेल साई पॅलेस येथे करण्यात आले होते यावेळी साळवे यांनी वरील मतं व्यक्त केले, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनिलतात्या धिवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डॉ सतीश केदारी, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम, हे उपस्थित होते, सत्काराला उत्तर देताना विष्णूदादा भोसले म्हणाले गेले अनेक वर्षे आंदोलने मोर्चे काढून, तालुक्यातील सोशीत वंचित घटकांना न्याय देताना, जात पात धर्म हे न पाहता अडचणीत असलेल्या व्यक्तीला मदत केली, त्यामुळे ज्या मातीत आमचा जन्म झाला, ज्या मातीत आम्ही वाढलो त्या मातीमध्ये आज आमचा, संत रविदास छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक, आदिवासी नेते या सर्व महापुरुषांच्या विचारांच्या वाली वारसांच्या उपस्थीतीत पंढरीनाथ जाधव आणि माझा सत्कार होतोय या पेक्षा मोठा सत्कार असू शकत नाही, असे विष्णूदादा भोसले यांनी सत्काराला उत्तर देताना आपले मतं व्यक्त केले, व आपल्या कामाकाजाचा लेखाजोखा मांडला .
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिलतात्या धिवार, यांनी विष्णूदादा भोसले आणि पंढरीनाथदादा जाधव यांनी पुरंदर तालुक्यात आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवली व त्यांनी निस्वार्थीपणे काम केले त्यामुळे त्यांचा गणगौरव होणे आवश्यक आहे त्यामुळे या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे असे सांगितले, यावेळी डॉ. सतिश केदारी, श्रीकांत कदम मनोहरनाना ताथवडकर , अँड . विजय भालेराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बंडूकाका जगताप , माजी नगरसेवक डॉ राजेश दळवी चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष गुलाबराव गायकवाड , सामाजिक कार्यकर्ते महादेव भोंडे, सासवड नगरपालिका पथारी संघटनेचे संचालक गुलाबराव सोनवणे, डॉ विनायक गायकवाड, पुरुषोत्तम पवार , विक्रांत भोसले, मंगेश गायकवाड, आण्णासाहेब खैरे, नामदेव नेटके,बळीराम सोनवणे, सुहास बेंगाळे कैलास धिवार यांनी सत्कार मूर्तींना शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याचा गुणगौरव केला, त्यानंतर आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ विचारवंत वसंतराव साळवे यांच्या शुभहस्ते प्रथम पंढरीनाथदादा जाधव यांचा शाल पुष्पगुच्छ सन्मान पत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले, त्यानंतर विष्णूदादा भोसले यांचा सपत्नीक वसंतराव साळवे यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन नागरी सत्कार करण्यात आला,
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सासवड शहर अध्यक्ष बाळासाहेब भिंताडे, काॅंग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक सोपानराव रणपिसे पी. एस आय. विजय जगताप, चक्रधारी सोनवणे माजी नगरसेवक राजेंद्र गिरमे, सय्यद सर शंकरराव जगताप कोडीत गावचे पोलीस पाटील गणेश बडधे, शिवव्याख्याते मोहन तळेकर रिपब्लिकन पक्षाचे नेते,दशरथ गायकवाड, आनंद रोकडे सर, माजी उपसभापती बापूसाहेब औचरे, पत्रकार नानासाहेब भोंगळे , पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर, पत्रकार बापू मुळीक, अमृत भांडवलकर, छायाताई नानगुडे सर्जेराव औचरे, रामकृष्ण वाघमारे सर, अँड अमोल वाघमारे, पप्पू ढगारे रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे शहर अध्यक्ष किशोर पंडागळे, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष सहजराव, संघटक सचिव गोविंद जगताप स्टीवन जोसेफ, सोनबा ओव्हाळ, विजय घोडेस्वार नामदेव नेटके, स्वप्नील पाटोळे, आबा वाघमारे, सुधीर शेलार, श्रीधर गायकवाड, सुनिल रणपिसे,सचिन कांबळे महेंद्र पोळ यांसह महिला व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाचे आयोजन, मनोहरनाना ताथवडकर सुनिलआप्पा जगताप, आप्पासाहेब भांडवलकर, संतोषदादा डुबल गौरव भोसले, भुजंग पवार, शशीभाऊ गायकवाड, राजेंद्र जावळेकर, गौतम भालेराव, अजय शिंदे, आण्णा शिंदे या गुणगौरव समितीच्या वतीने करण्यात आले होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनीलतात्या धिवार यांनी केले तर सुत्रसंचालन शिव व्याख्याते मोहन तळेकर यांनी केले, तरं आभार सुनिलआप्पा जगताप यांनी मानले.