तालुका प्रतिनिधी
शुभम गजभिये / चिमूर
दि. २१ ऑगस्ट/ आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी चिमूर तालुक्यातील बोथली (वहा.) येथील स्व. रामकृष्ण वाघ यांचा काही दिवसांपूर्वी अपघातामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आज त्यांच्या कुटुंबीयांना सांत्वनपर भेट दिली व त्यांच्याशी संवाद साधून धीर दिला. तसेच, आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या हस्ते शासनाच्या वतीने स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत आर्थिक मदत २ लक्ष रुपयांचा धनादेश श्रीमती. प्रेमिलाताई रामकृष्ण वाघ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी तालूका कृषी अधिकारी चिमूर तिखे सर, भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजपा किसान मोर्चा चिमूर विधानसभा संयोजक एकनाथ थुटे, भाजपा युवा नेते समीर राचलवार, सं.गां.नि.अ.यो. समिती अध्यक्ष संजय नवघडे, भाजपा ज्येष्ठ नेते रमेश कंचर्लावार, भाजपा ज्येष्ठ नेते घनश्याम डुकरे, भाजयुमो तालूकाध्यक्ष श्रीरंग (बालू) पिसे, भाजपा मच्छीमार सेल तालुकाध्यक्ष दिवाकर डहारे, भाजपा नेते बबलु पाटील थुटे, भाजयुमो तालूका महामंत्री रोशन बन्सोड, भाजयुमो चिमूर शहराध्यक्ष बंटी वनकर, भाजपा पं. स. सर्कल सहप्रमुख मनी रॉय, सरपंच ग्रा. पं. बोथली आनंद थुटे, भाजयुमो चिमूर शहर महामंत्री निखिल भुते, भाजपा बूथ अध्यक्ष रविंद्र कोलते, भाजपा युवा नेते – पवन निखाडे, राकेश झिरे, आशु झिरे, सचिन मेश्राम, राकेश भोयर, उमेश चट्टे व अन्य भाजपा नेते पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.