जिल्हा प्रतिनिधि
अनिल दुर्गे / वर्धा
मोझरी ( शेकापुर) )
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या महिला आघाडी तर्फे मा.उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांच्या आदेशाने तथा विभागीय संपर्कप्रमुख मा.खा. श्री. अरविंद सावंत साहेब तथा वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख श्री निलेश धुमाळ, हिंगणघाट विधानसभा संपर्क प्रमुख श्री उत्तम आयवले यांच्या सूचनेनुसार महिला आघाडीच्या वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख सौ .कांचनताई ठाकूर ,जिल्हा प्रमुख श्रीकांत मिरापूरकर ,माजी नगराध्यक्ष चंद्रकांत घुसे ,ज्येष्ठ शिवसैनिक सीतारामजी भुते, नगरसेविका सौ .नीता सतीश धोबे ,महिला शहर संघटिका सौ .सीमा गलांडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.महाराष्ट्र राज्यात ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श शाळेत तीन ते चार वर्षाच्या दोन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार दिनांक :-१२ ऑगस्ट २०२४ रोजी शाळेतील सदर घटना घडली. शाळेची तक्रार करण्याकरता पालक पोलीस स्टेशन गेले असता त्यांची तक्रार दहा ते बारा तास घेण्यात आली नाही. यामुळे संपूर्ण राज्यात उद्रेक निर्माण झाला .ठिकठिकाणी रस्ता रोको , रेल रोको या सारखे आंदोलन या राज्यात झाले. परंतु महाराष्ट्र सरकारच्या या गृहमंत्री व पालकमंत्री यांना जनतेशी काही घेणे देणे नाही. म्हणून मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांच्यामार्फत कायदा व सुव्यवस्था , झालेल्या घटनेचा जाहीर निषेध तसेच दोशीला फाशी तथा गृहमंत्री व पालकमंत्री यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा याकरिता निवेदन देण्यात आले . सदर निवेदन देण्याकरिता शिवसेनेचे माजी नगरसेवक मनीष देवडे, मनोज वरघणे ,भास्कर ठवरे ,गजानन काटवले, भास्कर भिसे, अमोल वादाफळे, दिनेश धोबे ,हिरामण आवारे ,नितीन वैद्य,आशिष जैस्वाल, चंदू भुते, दिलीप वैद्य ,फिरोज खान, मोहन वानखेडे, शकील अहमद, प्रशांत कांबळे, वसीम खान, शब्बार शेख, मारुती अर्हाडे, बंटी वाघमारे, विनोद मोहोड, सौ. सारिका अनासाणे, सौ. शालिनी वानखेडे, सौ. मंगलाबाई बोटकावार, अर्चना भोंगाडे, सौ. सारिका सातपुते, सौ. नीलिमा मोहम्मारे, सौ .मंगला ठवरे, सौ. हेमलता उईके, सौ. वर्षा धोबे, सौ. सुवर्ण वैद्य , उषा पराते ,सौ. पूजा मोहितकर, सौ. रुपाली आवारी, सौ. सविता नायसे, श्रीमती अनिता मोहारे, सौ. अनिता बोरनवार, सौ. कविता डेकाटे, अंजली तुळणकर, सौ. कल्पना कामडी, सौ .श्रद्धा वाघमारे ,सौ .प्रियांका धोटे, सौ. सोनाली काळे, श्रीमती वंदना चरडे, सौ.भारती थुटे, अनिता भंडारकर, सौ.अनिता भंडारकर ,सौ .गीता औरासे, सौ. नविमल तडस ,सौ. सुमन वैद्य, सौ. बेबी खुंडे, सौ. रेखा चाफले, पवन ठवरे, रितेश लडी, आकाश सुरकार, सचिन धोटे,मंगेश भुते, विजय कोरडे, हर्दिप काळे,निशिकांत नागोसे, प्रभाकर खडसे, सुभाष काटकर, आशिष भांडे, प्रवीण खंडारकर, इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.