तालुका प्रतिनिधी
शुभम गजभिये / चिमूर
दि. २३ ऑगस्ट/ आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी चिमूर तालुक्यातील सोनेगाव (वन.) येथील भाजपा कार्यकर्ते तथा बूथ अध्यक्ष श्री. पांडुरंगजी सोनवाने यांचे सुपुत्र स्व. रोशन पांडुरंगजी सोनवाने (वय/वर्षे – २६) यांचा काल गाव तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आज त्यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांना सांत्वनपर भेट दिली व त्यांच्याशी संवाद साधून धीर दिला. तसेच, स्व. रोशन पांडुरंगजी सोनवाने यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली आणि त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, भाजपा किसान मोर्चा चिमूर विधानसभा संयोजक एकनाथ थुटे, सं.गां.नि.अ.यो. समिती चिमूर अध्यक्ष संजय नवघडे, भाजपा ज्येष्ठ नेते घनश्याम डुकरे, माजी पं. स. सदस्य अजहर शेख, भाजपा नेते अर्जुन पाटील थुटे, माजी सभापती/नगरसेवक न. प. चिमूर सतीश जाधव, भाजयुमो तालूका महामंत्री रोशन बन्सोड, भाजपा पं. स. सर्कल सहप्रमुख मनी रॉय, भाजपा ज्येष्ठ नेते बंडूजी बारेकर, सरपंच्या गोरवे ताई, उपसरपंच वैभव नन्नावरे, रविंद्र कोलते, प्रमोद श्रीरामे, अनिल भजभूजे, वेणूदास बारेकर, उमेश चट्टे, नीलकंठ हजारे, बाबा नन्नावरे, आशु झिरे, राकेश भोयर व अन्य भाजपा नेते पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.