अशोक आईंचवार
शहर प्रतिनिधी अहेरी
अहेरी.. कुमारी राध्या पडमटींटीवार राहणार USA अमेरीका हिच्या वाढदिवस आज दिनांक 23/08/2024 रोज शुक्रवारला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्येकंटापुर त. अहेरी, व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगेपल्ली त. अहेरी, तसेच विदर्भ वनवासी कल्याण आश्रम वस्तीगृह अहेरी ,या तीन ठिकाणी आगळ्या वेगळ्या पध्दतीने श्री मनोज सावकार अनंतुलवार व सौ.समृध्दी मनोज अनंतुलवार या आजोबा आजीने वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन आदरणिय मा.भोसले सर ज्येष्ठ नागरीक तथा राष्टृपती पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षक अहेरी. प्रमुख अतिथी म्हणुन अहेरी नगरातील व्यापारी संघटनेचे अध्य क्ष मा.प्रमोद सावकार दोंतुलवारजी होते. प्रमुख अतिथी म्हणुन मा.कन्हैयालालजी रोहरा ,श्री अशोक निकुरे ज्येष्ठ नागरीक कल्याण मंडळ अहेरीचे सचिव तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते. शाळांचे शिक्षक वृंद आणि महिला बचत गटाचे सदस्य गण उपस्थित होते. मा.भोसले सर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करुन दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरवात करण्यात आले .उपस्थित पाहुण्याचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत करण्यात आले .संचलन श्री ठिकरे सर ध.कृ.विद्या .अहेरी यांनी केले. प्रास्ताविक श्री अशोक निकुरे सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांनी केले .या आयोजीत कार्यक्रमात व्येकंटापुर शाळेतील 30 विद्यार्थाना व वांगेपल्ली शाळेतील 18 विद्यार्थाना तसेच वनवासी कल्याण आश्रम वस्तीगृहातील40 विद्यार्थाना 1)स्कुल बँग 2)कंपासपेटी 3)प्रती विद्यार्थी 5 नोटबुक 4)पेन्सील 5)खोडरबर 6)पेन 7)वाँटर बाटल ईत्यादी लेखन साहीत्य वाटप केले. प्रास्ताविकेत श्री अशोक निकुरे सरांनी दानाचे महत्व पटवुन विद्यार्थाना मार्गदर्शन केले .अध्यक्ष स्थानावरून श्री भोसले सरांनी लहान लहान मुलांना सोप्या पध्दतीने आई. वडील व गुरु यांची महीमा सांगितले .मैत्रीचे महत्व समजावुन सांगितले एखादी वस्तु गरजू विद्यार्थाना दान करने हे एक पुण्याचे कार्य आहे .हे पुण्य आपल्या सोबत शेवट पर्यत राहते. या विषयावर मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचा शेवट या सर्व विद्यार्थासाठी व उपस्थित पाहुण्यासाठी गोडधोड व स्वरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली. सर्वाचे आभार श्री ठिकरे सरांनी मानले. भोजनानंतर कार्यक्रमाचा शेवट करण्यात आले हा कार्यक्रम श्री मनोज सावकार अनंतुलवार व त्यांची पत्नी सौ.समृध्दी मनोज अनंतुलवार या दापंत्यानी खेळ्यापाळ्यातील गरीब मुलामुलींसाठी मदत व सहकार्याची भावना व प्रेम ठेवुन हा कार्यक्रम घडवुन आणले .या प्रित्यर्थ या दोंघानाही ईश्वर ऊदंड आयुष्य देवो अशी प्रार्थना करतो. कु राध्या आशिष पडमटिंटीवार यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा व गोड गोड पप्पी🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕सौ.उमादेवी व श्री रामन्नाजी पडमटिंटिवार यांच्या कडुन वनवासी कल्याण आश्रम वस्तीगृह अहेरी यांना दोन सिलींग फँन भेट म्हणुन देण्यात आले