महाराष्ट्रातून बाळासाहेब आंबेकर,संजय देशमुख ,पुरूषोत्तम गावंडे,चेतन भैरम ईलनामध्ये
अकोला : शेतकरी आणि जनसामान्न्यांच्या न्याय्य हक्कासाठी झगडणारं एक संघर्षशील आक्रमक व्यक्तीमत्व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध देशोन्नती दैनिकाचे मुख्य संपादक,ज्येष्ठ पत्रकार श्री.प्रकाशभाऊ पोहरे यांची ईलनाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर अविरोध निवड झाली आहे.इंडीयन लॅंग्वेजेस न्यूजपेपर्स असोसिएशन (ईलना ) ही देशातील सर्वभाषिक वृत्तपत्रांच्या संपादक प्रकाशकांची राष्ट्रीय संघटना असून दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनमध्ये संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली.माजी राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुनिल डांग हे या सभेचे अध्यक्ष होते,व त्यांनीच निवडणूक अधिकारी म्हणून भुमिका बजावली. देशातील वृत्तपत्रांचे केन्द्र आणि राज्य सरकारांकडील प्रश्न सोडविण्याठी लढा देणारी ही स्वातंत्र्यपूर्व काळात १९४५ साली मुंबईतून सस्थापन झालेली संघटना असून या व्यासपीठावर देशाचे. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी उपस्थिती दिली आहे.याप्रसंगी दिल्लीत झालेल्या सभेत ईलना संघटन वाढवून संपादक प्रकाशकांना न्या देण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्षपदाची सुत्रे प्रकाश पोहरे यांचेकडेच सोपवावीत असा प्रस्ताव मांडण्यात आला.त्याला आवाजी मतदानाने आणि बाकडे वाजवून सर्वांनी स्वागत केले.यावेळी प्रथम झालेल्या आढावा बैठकीत व्यासपीठावर सुनिल डांग यांचेसह प्रकाश पोहरे,रविकुमार बिष्णोई,बाळासाहेब उर्फ बाळकृष्ण आंबेकर व मागील सचिव म्हणून संजय देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी डी.ए.व्ही.पी व प्रेस रजिस्ट्रारकडून जाचक अटी व वृत्तपत्र संपादक प्रकाशकांना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली.त्यासाठी संघटीत लढ्याची रूपरेषा निश्चित करण्याचे ठरविण्यात आले. ईलनामध्ये एकून कार्यकारी सदस्य असून दरवर्षी नव्या ७ जणांची निवडकेली जाते.परंतू मागील वर्षात सर्वसाधारण सभा न झाल्याने यावेळी १४ सदस्यांची अविरोध निवड करण्यात आली.आता मा.प्रकाशभाऊ पोहरे यांचे अध्यक्षतेखाली अनुक्रमे ७ च्या गटाने १ ते वर्षासाठी विवेक गुप्ता,रविकुमार बिष्णोई,अंकित बिष्णोई, डॉ.संजय गुप्ता,ललित भारव्दाज,संजय देशमुख (अकोला),डी.डी.मित्तल,बसवराज गोविदप्पागौल,जी.सी शर्मा,नागप्पा,पुरूषोत्तम गावंडे,संदिप गुप्ता,शिवकुमार अग्रवाल,बाळकृष्ण आंबेकर, चेतन भैरम,सुधीर पांडा,यशपाल सिंग,सरोजीनी आर्गे, डॉ.अभिषेक वर्मा, डॉ.रणदिप घणघस या २१ सदस्याचे कार्यकारी मंडळ निश्चित करण्यात आले.या सभेत कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात,हरियाणा,उत्तर प्रदेश,दिल्ली,पश्चिम बंगाल आदी राज्यातील ईलना सभासद उपस्थित होते.यानंतर
नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी कार्यकारी मंडळाची निवड केली.यामध्ये विवेक गुप्ता व अंकीत बिष्णोई यांची उपाध्यक्ष म्हणून तर जनरल राष्ट्रीय महासचिव म्हणून डॉ.रणदिप घणघस, डॉ.संजय गुप्ता तर महाराष्ट्रातून पुरूषोत्तम गावंडे यांची निवड करण्यात आली.बाळासाहेब आंबेकर कोषाध्यक्ष तर याशिवाय ईलनाचे माजी अध्यक्ष व निवडणूक अधिकारी सुनिल डांग यांची मार्गदर्शक मंडळाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी तर चेतन भैराम यांची महाराष्ट्र अध्यक्षपदी,डॉ ललित भारव्दाज उत्तर प्रदेश,सुरेश भुषण जैन दिल्ली,तर सुधीर पांडा यांची ओरिसा राज्याध्यक्षपदी तर महेश दमशेट्टी यांची कर्नाटक अध्यक्षपदी निवड करण्यात आली. कार्यकारी सदस्य म्हणून विश्वप्रभात संपादक संजय देशमुख यांचेसह ०७ जण गोवा सभेपासूनच कायम ठेवण्यात आले आहेत.ईतर १४ जणांची निवड अविरोध निवड करण्यात आली आहे.सभेसाठी येणाऱ्या सभासदांच्या निवास व्यवस्थेपासून तर सभेच्या जय्यत तयारीही व्यवस्था अॕड.दिलीप केने यांनी उत्तम प्रकारे पार पाडली. ईलनाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर निवड झाल्याबध्दल विदर्भ व महाराष्ट्राला प्राप्त झालेल्या या बहूमानाबध्दल त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक – राष्ट्रीय अध्यक्ष व ईलना पदाधिकारी संजय देशमुख,मराठी पत्रकार परिषदेचे माजी राज्याध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मिरसाहेब,प्रमोद लाजूरकर व अकोल्यातील असंख्य पत्रकारांनी व अनेक सामाजिक संघटना, तथा सामाजिक नेत्यांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.